Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: बाणावलीत युवकाचा खून; अनैतिक संबंधातून हत्‍या केल्‍याचा संशय

Goa Crime News: पत्नीची चौकशी : अनैतिक संबंधातून हत्‍या केल्‍याचा संशय

दैनिक गोमन्तक

Goa Crime News:

पेडा-बाणावली येथे पत्‍नीसोबत भाड्याच्‍या खोलीत राहणाऱ्या विश्‍वनाथ सिदनाळ (वय 35 वर्षे) या मूळ लोंढा-कर्नाटक येथील युवकावर कुणीतरी तीक्ष्ण हत्याराने हल्‍ला करून खून केल्‍याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

यामागे अनैतिक संबंध हे कारण असावे, असा प्राथमिक निष्‍कर्ष व्यक्त करण्‍यात येत आहे. याप्रकरणी आम्ही अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिली. सध्या पोलिस विश्‍वनाथच्या पत्नीची चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हा खून रविवारी झाला असावा, असे सांगण्यात येत असून त्याचा मृतदेह आढळला, त्याला मुंग्या लागल्या होत्या. एक युवक विश्‍वनाथ याचीच मोटारसायकल घेऊन जातानाची छबी रस्‍त्‍यावरील सीसीटीव्‍हीत टिपली आहे.

आई जेवण घेऊन आली अन्...

ही घटना रविवारी घडली असावी, असा निष्‍कर्ष आहे. सोमवारी पहाटे 4 वाजण्‍याच्‍या सुमारास विश्‍वनाथ याची पत्‍नी घराबाहेर पडली होती. विश्‍वनाथची आई सुरावली येथे राहते. आज (मंगळवारी) दुपारी ती आपल्‍या मुलाला जेवण घेऊन आली असता,

तिला हा प्रकार दिसून आला. तिने शेजाऱ्यांना बोलावून घेतल्‍यावर पोलिस तक्रार करण्‍यात आली. पोलिसांनी घटनास्थळी श्‍वानपथकाच्या साहाय्याने खुन्याचा माग घेण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांचे पथक खानापूरला रवाना

हा खून केल्यावर संशयिताने विश्‍वनाथच्याच दुचाकीचा वापर करून मडगाव रेल्वे स्थानक गाठले. त्यानंतर त्याने ती दुचाकी तिथेच टाकून रेल्वेने पलायन केल्याचा पोलिसांचा कयास असून तो खानापूरला गेला असावा,

अशी शक्यता गृहीत धरून तिकडे पोलिस पथक पाठविले आहे. खुनी कोण असावा, याचा सुगावा पोलिसांना लागला असला तरी त्याचे नाव त्यांनी अद्याप उघड केलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT