Goa Politics: ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने निदर्शने; भाजपवर टीकास्त्र

Goa Politics: भाजपवर टीकास्त्र: आझाद मैदानावर जाण्यास पोलिसांचा मज्जाव
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics:

भाजपविरोधात बोलल्यास तुरुंगात टाकण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. लोकसभा निवडणुकीचे वातावरण तयार झालेले असतानाच विरोधी ‘इंडिया’ आघाडीचे सदस्य असलेल्या पक्षांचे झारखंडमधील झामुमोच्या आणि दिल्लीच्या आपच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे.

त्याचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने सहभागी नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. याप्रसंगी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस,

क्रुझ सिल्वा, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आम आदमी पक्षाचे निमंत्रक ॲड. अमित पालेकर, प्रवक्ते वाल्मिकी नाईक, सुरेल तिळवे, राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) जुझे फिलीप डिसोझा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जितेश कामत, काँग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर, विरियातो फर्नांडिस यांच्यासह इतर विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Goa BJP
Goa Congress Loksabha Candidate: काँग्रेस पक्षातील उमेदवारांच्या नावांवर आज चर्चा

युरी आलेमाव म्हणाले, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून केला जात आहे. आमच्यावरही दबाव आणला जातो, पण आम्ही त्या दबावाला झुगारून लोकशाही मार्गाने आमचे म्हणणे मांडत आहोत. दिल्ली किंवा झारखंडमध्ये ज्यापद्धतीने मुख्यमंत्र्यांना अटक केली, ती तेथील प्रत्येकाला अटक केली आहे.

भाजपची ही दादागिरी आणि हुकूमशाही करीत आहे. भाजप सरकार सुरवातीला विरोधकांना खरेदी करण्याचा प्रयत्न करते, तो प्रयत्न फसल्यानंतर त्यांच्यामागे ईडी, सीबीआय, आयटी अशा यंत्रणा लावते. देशात विरोधक एकत्रित आले आहेत. गोंयकारांसाठी जे विषय असतील, त्यासाठी आम्ही लढत राहू.

Goa BJP
Goa Congress: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विरिएतो यांच्या भेटीगाठी सुरू

लोकशाही धोक्यात आहे, त्यामुळे भाजपला या निवडणुकीत जनता त्यांची जागा निश्‍चित दाखवून देईल. देशात रामराज्य नाही रावणराज्य चालत आहे, असा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दक्षिणेतील भाजपचा उमेदवार ६० हजार मतांनी निवडून येईल, असे जे विश्‍वासाने सांगत आहेत, तो खऱ्या अर्थाने जुमला आहे. भाजप दक्षिण गोव्यात बॅकफूटवर गेली

जो उमेदवार निवडून आल्यानंतर लोकसभेत गोव्याचे विषय तळमळीने मांडेल असाच उमेदवार इंडिया आघाडीकडून दक्षिण गोव्यात दिला जाईल, असेही आलेमाव यांनी नमूद केले. ॲड. पालेकर म्हणाले, आम्ही केवळ निदर्शने करण्यास आलो होतो, परंतु ज्या जागेवर कोणासही जाण्यास अडविता येत नाही, त्या आझाद मैदानावर निवडून दिलेल्या आमदारांनाही पोलिसांनी जाऊ दिले नाही, हे सर्वांनी पाहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com