New Mantralaya  Dainik Gomantak
गोवा

New Mantralaya At Porvorim: गीता पठण, विधिवत पूजनाने भव्यदिव्य मंत्रालयाचे उद्‌घाटन

नूतनीकरणावर दहा कोटींचा खर्च;आकर्षक प्रवेशद्वारासह सजले दालन

गोमन्तक डिजिटल टीम

New Mantralaya At Porvorim: घटकराज्य दिनाच्या मुहुर्तावर सनई-चाैघड्यांच्या वादनात मंगलमय वातावरणात आणि गीता पठणाने विधानसभा संकुल परिसरातील नूतनीकरण केलेल्या मिनिस्टर ब्लॉक्सचे आज, मंगळवारी ‘मंत्रालय’ असे नामकरण करण्यात आले.

हा विधिवत सोहळा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत वास्तू आणि उदक शांतीनंतर पडदा बाजूला सारून अनोख्या पद्धतीने झाला.

गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या वतीने नूतनीकरण आणि अत्याधुनिकरण केलेल्या मंत्रालयाचे आज विधिवत पूजन झाले.

यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यासंदर्भात मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ज्याप्रमाणे संसद भवन उभारले आहे, त्याचप्रमाणे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन मंत्रालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. इतर राज्यांतही अशा प्रकारची मंत्रालये आहेत.

त्याचप्रमाणे गोवा प्रशासनाची पुढील ५० वर्षांची गरज लक्षात घेता नूतनीकरण करणे महत्त्वाचे होते आणि तसे ते केले आहे.  याकरिता दहा कोटी रुपये खर्च आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विष्णू सहस्रदर्शन

मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालय तिसऱ्या मजल्यावर उभारले असून येथील प्रवेशद्वार लक्षवेधी आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सुरुवातीला भव्य दालन असून अशोक स्तंभाची राजमुद्रा आणि त्याखाली ‘सत्यमेय जयते’ साकारले आहे.

मुख्य दालनासमोर विष्णू सहस्रदर्शनरूपी कलाकृती उभारली असून ती उडुपी येथून आणली आहे. या मूर्तीवर महाभारतातील युद्धाचे प्रसंग कोरले आहेत.

प्रवेशद्वारावर कदंबकालीन हत्ती

मांगल्याचे प्रतीक असणारे कदंब राजाचे बोधचिन्ह असलेल्या हत्तींच्या मूर्ती मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आल्या असून त्या कर्नाटकातील कुमठा येथून खास बनविण्यात आल्या आहेत.

येथे गणपतीची भव्य मूर्ती असून ती ‘रोझवूड’पासून बनविली आहे. त्याभोवतालची प्रभावळ आणि मंडल हे गोव्यातील प्रसिद्ध कावी कलेमधून बनविण्यात आले आहे. येथे एकूणच कलात्मक माहौल आहे.

पूजेचा मान वेदशास्त्री भावे यांना...

अत्यंत धार्मिक आणि मंगलमय वातावरण उदघाटन सोहळ्यासाठी सत्तरीतील वेदमूर्ती प्रकाश भावे यांच्या नेतृत्वाखाली पुरोहितांनी पाैराहित्याचे कार्य पार पाडले.

तसेच संस्कृत भारतीच्या चिन्मय आमशेकर यांनी तयार केलेल्या काणकोण येथील १५ मुलांच्या चमूने भगवद् गीतेतील ११ व्या अध्यायाचे पठण केले. याच मुलांनी गणपती अष्टक आणि कृष्णस्तोत्र पठण केले.

पाटोवर उभारणार ''प्रशासन स्तंभ''

राजधानी पणजीतील पाटो येथे राज्य प्रशासनाची भव्य इमारत उभारण्यात येणार असून ''प्रशासन स्तंभ'' असे नाव असलेली ही इमारत पणजीतील सर्वांत मोठी आणि उंच इमारत असेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले. येथे बहुतेक सर्व प्रशासकीय कार्यालये असतील. ही भव्य-दिव्य इमारत कशी असेल, हा विषय मात्र औत्सुक्याचा असेल.

नामफलक संस्कृतमध्ये

राज्यात पहिल्यांदाच संस्कृतमध्ये असलेल्या नामफलकाचे अनावरण आज करण्यात आले. याशिवाय या नव्या मंत्रालयातील बहुतांश फलक हे संस्कृतमध्ये लावण्यात आले आहेत.

नव्या सुशोभित केलेल्या इमारतीच्या बाहेरही संस्कृत भाषेमध्ये ‘मन्त्रालय’ असे लिहिण्यात आले आहे.

मंत्रोपचार : राज्यात पहिल्यांदाच फितकापणीच्या पारंपरिक रिवाजाला बगल देत या नूतनीकरण केलेल्या वास्तूचे विधिवत पूजन करून अनोख्या पद्धतीने उदघाटन करण्यात आले.

प्रवेशद्वारावरच्या पडद्याच्या गाठी सोडवून पडदा बाजूला करून मुख्यमंत्र्यांनी उदघाटन केले. यावेळी वास्तूप्रवेशाचा मंत्रोपचार आणि गीतापठण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT