FC Goa
FC GoaDainik Gomantak

FC Goa: एफसी गोवाचे सात खेळाडू करारमुक्त

अन्वर, रेडीम, माकन, हर्नान, व्हालियंते, लेनी, नोंगडाम्बा यांचा समावेश
Published on

FC Goa: आगामी देशांतर्गत फुटबॉल मोसमासाठी संघ बांधणी करण्याच्या उद्देशाने एफसी गोवाने मंगळवारी सात खेळाडूंना करारमुक्त केल्याचे जाहीर केले. यामध्ये अनुभवी लेनी रॉड्रिग्ज, भारतीय संघातील बचावपटू अन्वर अली, स्पॅनिश खेळाडू हर्नान सांताना व मार्क व्हालियंते, तसेच रेडीम ट्लांग, माकन चोथे, नोंगडाम्बा नाओरेम यांचा समावेश आहे.

एफसी गोवाने मुक्त केलेल्या सातही खेळाडूंचा करार 31 मे 2023 रोजी संपत आहे. संघाने या खेळाडूंना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

FC Goa
Indian Cricketer Retirement: WTC फायनलपूर्वी मोठी बातमी, 'या' स्टार खेळाडूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती!

दिल्ली एफसी संघात असलेला अन्वर अली जानेवारी 2022 मध्ये लोनवर एफसी गोवा संघात दाखल झाला. दोन मोसमात सेंटर-बॅक खेळाडूने आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे 30 सामन्यांत प्रतिनिधित्व केले.

आयएसएल, ड्युरँड कप, सुपर कपसह एएफसी चँपियन्स लीग आदी स्पर्धांत मिळून माकन चोथे व रेडीम ट्लांग हे दोघेही एफसी गोवातर्फे सुमारे 40 सामने खेळले.

व्हालियांते गतमोसमाच्या सुरवातीस एफशी गोवा संघात दाखल झाला, मात्र 2022-23 मोसमाच्या मध्यास दुखापतीमुळे त्याला स्पेनमध्ये परतावे लागले आणि त्याची जागा हर्नान सांताना याने घेतली. तो एकंदरीत सात सामने खेळला.

लेनी रॉड्रिग्ज एफसी गोवातर्फे 2018 ते २०२१ या कालावधीत खेळला, त्यानंतर यावर्षी जानेवारी महिन्यात तो पुन्हा या संघात दाखल झाला. 2019 मधील सुपर कप आणि 2020 मध्ये आयएसएल लीग विनर्स शिल्ड विजेत्या कामगिरीसह तो एफसी गोवातर्फे सर्व सामन्यांतून मिळून 60 सामने खेळला.

FC Goa
धोनी-जड्डूची दोस्ती ते गिलची शतकं; IPL 2023 मधील 7 अविस्मरणीय क्षण

भारताच्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक संघातून खेळलेला नोंगडाम्बा नाओरेम ऑगस्ट 2021 मध्ये एफसी गोवा संघात दाखल झाला. 2021-22 मधील आयएसएल स्पर्धेत त्याने एफसी गोवाचे 12 सामन्यांत प्रतिनिधित्व केले.

कार्नेरो केरळा ब्लास्टर्समधून बाहेर

केरळा ब्लास्टर्सचा कर्णधार गोमंतकीय फुटबॉलपटू जेसेल कार्नेरो याने 31 मे 2023 रोजी संपणारा करार न वाढविण्याचा निर्णय घेतला. तो या संघातर्फे चार वर्षे खेळला. लेफ्ट-बॅक खेळाडू 2019-20 मोसमाच्या सुरवातीस केरळा ब्लास्टर्स संघात दाखल झाला.

2021-22 मोसमात त्याची संघाच्या पूर्णवेळ कर्णधारपदी नियुक्ती झाली. चार मोसमांत तो केरळा ब्लास्टर्सकडून 65 सामने खेळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com