Dabolim Airport: वर्षभरात 83 लाख प्रवाशांकडून दाबोळी विमानतळाचा वापर; 348 चार्टर उड्डाणे

गेल्या वर्षी केवळ 39 चार्टर फ्लाईट्स
Dabolim Airport | Charter Flights in 2022-23
Dabolim Airport | Charter Flights in 2022-23Dainik Gomantak

Dabolim Airport: आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये गोव्यातील दाबोळी विमानतळावर चांगला चार्टर हंगाम लाभला असून या काळात गोवा दाबोळी विमानतळाने सुमारे 348 चार्टर उड्डाणे हाताळली आहेत.

यातून जवळपास 83.5 लाखी प्रवाशांनी दाबोळी विमानतळाचा वापर केला, अशी माहिती दाबोळी विमानतळ संचालक धनंजय राव यांनी दिली.

Dabolim Airport | Charter Flights in 2022-23
MLA Michael Lobo: वाहतूक नियमभंगाची दररोज 40 प्रकरणे नोंदविण्याचे ट्रॅफिक पोलिसांना टारगेट

राव म्हणाले की, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये गोवा विमानतळाला चांगला चार्टर हंगाम लाभला असून या हंगामात सुमारे 348 चार्टर उड्डाने हाताळली असल्याचे सांगून यातून जवळपास 83.5 लाख प्रवासी दाबोळी विमानतळावर हाताळले गेले.

ते म्हणाले, दाबोळी विमानतळावर मागील कोविड महामारीमुळे विस्कळीत पर्यटन हंगामाच्या तुलनेत चार्टर तसेच नियमित प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या 39 चार्टर फ्लाईट्सवरून या पर्यटन हंगामात चार्टर फ्लाइट्सची संख्या 348 झाली आहे.

Dabolim Airport | Charter Flights in 2022-23
Goa-Delhi Flight: विमानात प्रवाशाने केली एअरइंडियाच्या क्रु मेंबरला मारहाण; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील घटना

चार्टर्ड फ्लाईटने मागील वर्षी 14000 विषम चार्टर पर्यटकांच्या तुलनेत 1.4 लाख आंतरराष्ट्रीय चार्टर पर्यटकांची संख्या आणली. तर 2022-23 या आर्थिक वर्षात जवळपास 83.5 लाख लोकांनी दाबोळी विमानतळाचा वापर केला आहे.

दाबोळी विमानतळावर कझाकस्तान (स्कॅट एअरलाइन्स), रशिया, किर्गिझस्तानहून (एरोन नोमॅड), अझूर रशिया, तुई-यूके येथून चार्टर फ्लाईट दाखल झाल्याने पर्यटन हंगाम खूप चांगला गेला.

आम्हाला यावर्षी अधिक रहदारीची अपेक्षा आहे. कोणतेही निर्बंध नसल्याने आणखी चार्टर येतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com