Leopard Dainik Gomantak
गोवा

धाडसी गौरीताई! बिबट्याला कोंडून ठेवले तब्बल सहा तास

खोला येथील गौरी वेळीप यांचे सर्वत्र कौतुक

दैनिक गोमन्तक

खोला येथील एका घरात रात्रीच्यावेळी बिबट्या (Leopard) घरात घुसला होता. घरमालकीणीने प्रसंगावधान राखून रात्री अकरा वाजल्यापासून बिबट्याला सहा तास खोलीतच कोंडून ठेवले. त्यानंतर पहाटे पाच वाजता वनखाते वनविभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी पिंजरा लावून बिबट्याला पकडून त्याची रवानगी बोंडला अभयारण्यात केली. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.खोला येथील गौरी गोविंद वेळीप हिने हे धाडस केले आहे त्याबद्धल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

गौरीताईंचे पती गोविंद घराबाहेर सोफ्यावरती झोपले होते. मुले दुसऱ्या खोलीत अभ्यास करीत होती. एवढ्यात त्यांचा पाळीव कुत्रा मोठमोठ्याने भूंकून घरात शिरला त्याच्या मागोमाग मादी बिबटा पण घरात शिरला त्यावेळी गौरी स्वयंपाक घरात आवराआवर करीत होती. प्रसंगावधान राखून गोरीने दार बंद केले या तिच्या धाडसाबद्धल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. हल्लीच्या दिवसांत खोला येथे पाळीव प्राण्यांचा बिबट्या कडून फडशा पाडला जात होता. बारा वर्षांपूर्वी खोला येथे असाच एक बिबटा घरात घुसला होता त्यालाही घरमालकीणीने असेच घरांत डांबून ठेवले होते.

बारा वर्षा पूर्वी खोला पंचायत क्षेत्रातील रंगावती पुतू वेळीप हिने घरात घुसलेल्या बिबट्याशी झुंज देऊन त्याला घरात अशाच प्रकारे कोंडून ठेवले होते. त्यावेळी काणकोणातील (Canacona) वेगवेगळ्या संस्थानी तिच्या धाडसाबद्धल तिचा गौरव केला होता. माटवेमळ जवळच राहणाऱ्या सुमारे ४५ वर्षाच्या गौरीने पुन्हा हे धाडस केले आहे. भर वस्तीत फिरणाऱ्या या मादी बिबट्याचा या भागात सर्वानीच धसका घेतला होता. पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडण्यासाठी तो गौरीच्या घरात घुसला आणि स्वतःच जेरबंद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंदार सुर्लकर यांच्या मारेकऱ्यांना माफी मिळणार? दोषींच्या वकिलांनी लावला जोर; गोवा खंडपीठाच्या सोमवारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

पोर्तुगीजकालीन कागदपत्रे आता एका क्लिकवर! 'गोवा ऑनलाईन' पोर्टलवर सुरु होणार सर्वात मोठी डिजिटल सेवा; नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार

खरी कुजबुज: युती तुटणार? की वाद मिटणार?

Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Goa Mega Project Protest: गावाचे गावपण नष्ट करु नका! दवंडे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; 15 दिवसांत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन

SCROLL FOR NEXT