अडलेल्यांना मदतीचा हात देणे हीच खरी सेवा; वकील सिद्धी शेट्ये

गावकऱ्यांसाठी समाजसेवकांचा हाथ पुढे
Lawyer Siddhi Shetty
Lawyer Siddhi ShettyDainik Gomantak
Published on
Updated on

सामाजिक बांधिलकी ओळखून काम करताना जो आनंद मिळतो तो कोणत्याही पैशात किंवा धनसंपदेत मिळत नाही, जे अडलेले असतात आणि ज्यांना खरी मदतीची गरज असते त्याची सेवा करणे म्हणजे माणुसकीचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन वकील सिद्धी जीत आरोलकर (Lawyer Siddhi Shetty) यांनी आश्वे मांद्रे येथील नुकतेच चक्रीवादळात वीज पडून अनेकांच्या घरांचे नुकसान झाले त्याना मांद्रे मगो आणि उद्योजक जीत आरोलकर मार्फत वकील सिद्धी आरोलकर यांनी रोख रक्कम देताना स्थानिक पत्रकारांकडे (Journalists) बोलताना सांगितले.

मागच्या चार दिवसापूर्वी अचानक आलेल्या चक्रीवादळाने केरी आणि आश्वे येथे अनेक घरावर नारळाची झाडे पडून लाखो रुपयांची नुकसानी झाली होती .

दिवाळीचा सणानिमित्ताने पेडणेवासीय (Pernem) मग्न होते, शिवाय सायंकाळी आपापल्या आस्थापनात आणि घरात लक्ष्मि पूजन करण्याची तयारी चालू असतानाच सायंकाळी ६ वाजल्यापासून जोरदार कडक्याचा पाऊस विजा सहित पडत होता त्यात पवन वाडा केरी येथील लाखो रुपयांचे नुकसान झाले होते, घरावर आंब्याची नारळाची झाडे, फांद्या पडून वीज वाहिल्या रस्त्यावर पडल्या सर्वत्र अडथळे तर दुसऱ्या बाजूने गाव अंधारात चाचपडत होता, विजेचा लंपंडाव चालू होता, तर हणखणे येथे मजुरावर वीज पडून त्याचा बळी गेला होता .

Lawyer Siddhi Shetty
बोर्डेत उभारण्यात आले सौर ऊर्जेवरील पथदीप

अनेकांच्या घराचे झोपड्यांचे छप्पर उडून गेले. घटनास्थळी त्याच दिवशी मगो पक्षाचे नेते जीत आरोलकर (Party leader Jeet Arolkar) यांच्या पत्नी सिद्धी आरोलकर यांनी भेट देवून त्यांना सहानभूती दाखवत असताता तत्काळ आर्थिक मदत देण्यात आली. शिवाय मांद्रे आम आदमी पक्षाचे नेते वकील प्रसाद शहापूरकर यांनी घटनास्थळी धाव घेवून विचारपूस केली व सरकारने त्वारीत नुकसानी भरपाई द्यावी अशी मागणी केली होती, सरकारकडून अजून मदत मिळाली नाही मात्र जीत आरोलकर यांनी त्वरित मदतीचा हात पुढे केला.

केरी येथील मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानग्रस्त पावूल देसोझा, निर्मला तिरोडकर, प्रभाकर बाबरेकर आणि अरुण हरजी यांना त्वरीन सिद्धी जीत आरोलकर यांनी मदतीचा हात दिला, शिवाय अनेकांच्या घरावर झाडे पडून लाखोंची नुकसानी झाली होती.

अचानक वादळी वारे आल्याने त्याचा मोठा फटका केरी भागाला बसला, अनेकांच्या घरावर, झोपड्यावर दोन दोन नारळाची झाडे पडलेली होती. आश्वे मांद्रे येथे घरावर वीज पडून झालेल्या नुकसानग्रस्त व्यक्तीला सिद्धी आरोलकर यांनी मदत केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com