Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Karnataka Election Result 2023 : "द कर्नाटक स्टोरी" म्हणजे 2024 चे लोकसभेचे कथानक - युरी आलेमाव

इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रसिद्धीसाठी हपापलेल्या भाजपसाठी हा धडा आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Karnataka Election Result कर्नाटकात विधानसभा निवणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर गोव्यातील काँग्रेस नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राजकारणाला नवीन दिशा देणाऱ्या विजयाबद्दल कर्नाटक काँग्रेसचे अभिनंदन करत असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे. आगामी काळातही काँग्रेस पक्ष अग्रेसर राहील असेही त्यांनी यावेळी म्हटले.

कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाबाबत बोलताना युरी आलेमाव यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. या देशात सामान्य माणूस त्रस्त आहे.

महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारामुळे प्रत्येक घराचे बजेट कोलमडले आहे. इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रसिद्धीसाठी हपापलेल्या भाजपसाठी हा धडा आहे, अशी टीका युरी आलेमाव यांनी केली आहे.

तसेच नुकत्याच प्रदर्शतीत झालेल्या 'द केरला स्टोरी' चित्रपटाचा संदर्भ देत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय.

कथानकांवर आधारीत सिनेमा बघण्यापेक्षा जनतेच्या हाल अपेष्टांकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे कर्नाटकच्या निकालाने स्पष्ट झाले आहे असे युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

परप्रांतीयांना जमीन विकणार नाही! अडवईतील ग्रामस्थांचा निर्धार; कारापूर, कुडतरीत मेगा प्रकल्पांना 'चले जाव'

Cyber Crime: अडीच कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश; गोवा पोलिसांची 11 राज्यांत कारवाई; 7 जेरबंद

वरिष्‍ठ अधिकाऱ्यांच्या छळामुळेच साहाय्यक जेलरची आत्महत्या; रामनाथ गावडे यांच्‍या पत्नीचा आरोप, पोलिसांत तक्रार; प्रकरणाची सखोल चौकशी होणार

Horoscope: श्रावणातील पहिला सोमवार ठरणार अत्यंत शुभ! महादेवांच्या कृपेने तुळ, कुंभसह 'या' 3 राशींचे नशीब उजळणार, आर्थिक लाभ मिळणार

Nashamukt Yuva For Viksit Bharat: गोव्यात नशामुक्त युवा अभियानासाठी मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक; ड्रगविरोधी लढा तीव्र

SCROLL FOR NEXT