Karnataka Election Result 2023 : लोकशाहीला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी हे जनमत- पाटकर

गोव्यातील भाजप नेत्यांनी ज्या उमेदवारांचा प्रचार केला ते देखील या निवडणुकीत पडले
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak

Karnataka Election Result 2023 कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत भाजपचा पाडाव केलाय. या ऐतिहासिक विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. गोव्यात देखील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटकातील जनतेचे अभिनंदन केलेय.

गोव्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकी बद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कर्नाटकातील विजयाबद्दल कर्नाटक जनतेचे अभिनंदन केलंय.

Amit Patkar
Karnataka Election Result 2023 : हुकूमशाही आणि महागाईच्या विरोधात लोकांचा कौल- पणजीकर

काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि कर्नाटकात पक्षाला बहुमत कर्नाटकच्या जनतेचे मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. लोकांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी, सामाजिक भेदभाव, महागाई आणि पैशाच्या विरोधात मतदान केले आहे.

लोकशाहीला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी हे जनमत आहे अशा शब्दात गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

Amit Patkar
Boat Drowned at Miramar: गोव्यात मिरामार येथे बुडाली बोट

कर्नाटकात भाजपच्या प्रचारासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांची फौज गेली होती. त्या नेत्यांनी ज्या उमेदवारांचा प्रचार केला ते देखील या निवडणुकीत पडले. गोव्यातील म्हादईचा गळा घोटणाऱ्या नेत्यांना कर्नाटक जनतेने चांगला धडा शिकवला असा खोचक टोला पाटकर यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com