Goa Congress  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: सांकवाळप्रकरणी ‘एफडीए’ आपली जबाबदारी झटकतेय !

निवेदन सादर; संचालकांना जाब विचारत दिले निवेदन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची नाही’ असे वक्तव्‍य खात्याच्या संचालक ज्योती सरदेसाई यांनी केल्याने सर्वांच्‍या भुवया उंचवल्‍या आहेत.

जनतेने सतर्क राहून नळाद्वारे मिळणाऱ्या पाण्याची गुणवत्ता स्वतःच तपासावी असे आवाहन करीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी एफडीए आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप केला.

तसेच त्‍यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मंगळवारी (ता.25) एफडीएच्या संचालक ज्योती सरदेसाई यांची भेट घेऊन सांकवाळ घटनेप्रश्‍नी प्रश्‍‍नांचा भडिमार करून त्‍यांना जाब विचारला व निवेदनही सादर केले.

या शिष्टमंडळात कॅप्टन विरियातो फर्नांडिस, अमरनाथ पणजीकर, मोरेन रिबेलो, मनीषा उसगावकर, वीरेंद्र शिरोडकर, सावियो डिसिल्वा, विशाल वळवईकर, जॉन नाझारेथ, मुक्तमाला फोंडवेकर, नौशाद चौधरी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी राज्यात 8o एमएलडी पाण्याचा तुटवडा असल्याचे अधिकाऱ्यांनी कबूल केले. या तुटवड्यामुळे जनतेला टँकरच्‍या पाण्‍यावर अवलंबून राहावे लागते.

दुर्दैवाने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरमधून दूषित पाणी पुरविले जाते. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी एफडीएकडे कोणतीही यंत्रणा नसल्याचे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

हा विषय आमच्या अखत्यारित नाही : एफडीए

व्यावसायिक आणि घरगुती आस्थापनांसाठी होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा विषय हा एफडीएच्‍या कायद्याखाली येत नसल्याचा खुलासा एफडीए संचालनालयाने केला आहे. यासाठी अन्य खात्याकडे तक्रार केली जाऊ शकते, असे या खात्याने स्पष्ट केले आहे.

सांकवाळ येथे पाण्याच्या टँकरमधून दूषित पाणीपुरवठा केला जातो, असा आरोप स्थानिकांनी करून या प्रकरणात एफडीएने लक्ष घालावे असे म्हटले होते. त्‍यावर एफडीएने हा खुलासा केला आहे.

तरीही खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक हॉटेल्स आणि भोजनालयात वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने तपासण्याची व्यापक मोहीम एफडीए हाती घेणार असल्‍याचे खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सांकवाळच्‍या काही भागात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र त्या टँकरचा या विवादित बातमीत उल्लेख केलेल्या टँकरशी कुठलाही संबंध नसल्याचा खुलासा एफडीएने केला आहे.

सांकवाळ येथे पाण्याच्या टँकरमधून सांडपाणी वाहून नेण्‍याचा प्रकार एफडीएला माहित नसल्याचे त्‍या खात्‍याच्‍या संचालकांनी कबूल करणे हे धक्कादायकच आहे.

यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार लोकांच्या जीवाशी खेळत असल्‍याचे स्‍पष्‍ट होत

- अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

SCROLL FOR NEXT