Murgao Municipality Election: निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप सत्तासंघर्ष

भाजप विरुद्ध भाजप संघर्ष सुरू झाल्याने माविन गुदिन्हो यांनी नगरसेवकांना बोलावून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला
Murgao Municipality
Murgao Municipality Dainik Gomantak
Published on
Updated on

Murgao Municipality Election: मुरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी रामचंद्र कामत यांची बिनविरोध निवड झाली. परंतु या निवडीवेळी भाजप विरुद्ध भाजप असा सत्तासंघर्ष निर्माण झाला होता.

दाबोळीचे नगरसेवक विनोद किनळेकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने अखेर कामत यांची बिनविरोध निवड झाली.

उपनगराध्यक्ष निवडीसाठी भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाल्याने मुरगावचे पालकमंत्री तथा पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांच्या कार्यालयात दोन्ही नगरसेवकांना बोलावून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

Murgao Municipality
Goa Forward Party: सरकारची 'ती' योजना संशयास्पद, ॲक्सिस बँकेबाबत स्पष्टीकरण द्यावे

यावेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांचीही उपस्थिती होती. 17 नगरसेवकांनी आपला पाठिंबा नगरसेवक रामचंद्र कामत यांना अगोदरच जाहीर केला होता.

दरम्‍यान, माजी मंत्री मिलिंद नाईक यांचे कामत हे खंदे समर्थक असल्याने त्यांना उपनगराध्यक्षपदी आरूढ होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात होता, अशी माहिती काही नगरसेवकांनी आपले नाव न छापण्‍याच्‍या अटीवर दिली.

Murgao Municipality
CM Pramod Sawant: केंद्राच्या योजना राबविण्यासाठी जिल्हा पंचायतींचा पुढाकार आवश्यक - मुख्‍यमंत्री सावंत

अन्‌ किनळेकर यांनी घेतला अर्ज मागे

मुरगाव उपनगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्‍यात मुरगावातून भाजपचे नगरसेवक रामचंद्र कामत तर दाबोळीतून भाजपचेच नगरसेवक विनोद किनळेकर यांचा समावेश होता.

त्‍यामुळे ही निवडणूक भाजप विरुद्ध भाजप अशी झाली. पण नंतर वरिष्‍ठांच्‍या मध्‍यस्‍थीमुळे किनळेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला व रामचंद्र कामत यांची बिनविरोध निवड झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com