Bardez News Dainik Gomantak
गोवा

Bardez News: कचऱ्याचा प्रश्‍न; बेकायदेशीर बांधकामांवर पंचायतीचे दुर्लक्ष

पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याची समस्या गंभीर- उपाययोजनेची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Bardez News बार्देश तालुक्यातील साळगाव मतदारसंघात येणाऱ्या गिरी पंचायतीची ग्रामसभा रविवारी (ता.28) सकाळी 10.30 वाजता विद्यमान सरपंच सनी नानोडकर, उपसरपंच श्रेया नाईक, पंच कल्पेश नाईक, पंच नानोडकर यांच्या अनुपस्थित माजी सरपंच तथा विद्यमान पंचसदस्य बाबाजी गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायतच्या सभागृहात घेण्यात आली.

यावेळी पंचसदस्य सुकांती कांदोळकर, दालिनी फ्रॅंको, शुभम देसाई, जगन्नाथ गडेकर तसेच सचिव किर्तेश कोरगावकर उपस्थित होते. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली.

पावसाळ्यात गिरी परिसरात निर्माण होणाऱ्या समस्यांकडे पंचायत मंडळ व संबंधित खात्याचे अधिकारी लक्ष देत नसल्याचा विषय माजी सरपंच फोंडू नाईक यांनी मांडला.

त्यावर माहिती देताना सचिव किर्तेश कोरगावकर यांनी सांगितले की, या भागात 50 टक्के काम जलसिंचन खात्यातर्फे पूर्ण झालेले असून माती काढून टाकलेली आहे आणि नव्याने पाईपलाईन घातलेली आहे. त्यामुळे यावर्षी पाणी तुंबून राहणार नाही.

दरम्यान, फिलोमिना डायस यांनी गिरी पंचायत क्षेत्रामध्ये अनेक बेकायदेशीर बांधकामे होतात याकडे पंचायतीचे दुर्लक्ष झालेले आहे.

परवाना न घेताच बांधकामे सुरू असून यावर पंचायतीने कारवाई करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे डायस यांनी जे सरपंच, उपसरपंच, पंच ग्रामसभेला उपस्थित नसतात त्यांच्यावर कोणती कारवाई होते, असा प्रश्‍न विचारला.

लोकांना ‘सिवरेज’चा त्रास

शेतजमिनीमध्ये मातीचा भराव टाकून बेकायदेशीर बांधकामे केली जातात ती बंद करण्याकडे पंचायतीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. पंचायत क्षेत्रामध्ये सिवरेज प्लांटचे काम सुरू असून त्यातील घाण बाहेर येत आहे; परंतु त्याची सुरक्षितता राखली जात नसल्याने लोकांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे.

पंचायत क्षेत्रामध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याची व्यवस्था करावी. बार्देश तालुक्यामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून निवडून आलेल्या आमदारांनी याकडे अजिबात लक्ष दिलेले नाही;

परंतु साळगाव मतदारसंघातून नुकत्याच निवडून आलेल्या आमदाराने काही प्रमाणात लक्ष दिल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. - फोंडू नाईक, माजी सरपंच

थोडीशी बाचाबाची : एका महिलेने आपल्या शेतजमिनीत असलेल्या बांधकामाला वीज घेण्यासाठी परवानगी पंचायत देत नसल्याने गोंधळ घातला. त्यावर सचिवांनी त्यास परवानगी देता येत नसल्याचे सांगितले. यावेळी पंचसदस्य दालिनी फ्रँको व त्या महिलेमध्ये बाचाबाची झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टीम इंडियाच्या पराभवानंतर 'हाय-व्होल्टेज ड्रामा'! हार्दिक-गौतमच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल Watch Video

ड्रग्जचा आता गोव्याच्या खेडेगावात शिरकाव; बेलारुसच्या महिलेला एक कोटी रुपयांच्या अमली पदार्थासह अटक

Goa vs Gujrat: गोव्याचा सलग दुसरा एकतर्फी विजय, गुजरातचा 4-0 गोलफरकाने फडशा

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावरून प्रवाशांची वाहतूक पूर्ववत, 'इंडिगो' प्रकरणानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरण दक्ष

Goa Live Updates: पर्वरीतील एकाची 70 लाखांची फसवणूक, केरळमधील एकाला अटक

SCROLL FOR NEXT