Passport Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: ‘पासपोर्ट रद्द’चा प्रश्‍‍न मांडला राज्यसभेत!

Goa BJP: प्रादेशिक पासपोर्ट (पारपत्र) कार्यालयाने पोर्तुगालमध्ये ज्यांच्या जन्माची नोंदणी झाली आहे, त्या भारतीय पारपत्रधारकांचे अलीकडेच नूतनीकरण केल्यानंतरही 70 हून अधिक नागरिकांचे पारपत्र रद्द केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa BJP: प्रादेशिक पासपोर्ट (पारपत्र) कार्यालयाने पोर्तुगालमध्ये ज्यांच्या जन्माची नोंदणी झाली आहे, त्या भारतीय पारपत्रधारकांचे अलीकडेच नूतनीकरण केल्यानंतरही 70 हून अधिक नागरिकांचे पारपत्र रद्द केले आहेत. हा विषय राज्यसभा खासदार तथा भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत शून्य तासात मांडला.

तानावडे यांनी या पारपत्र रद्दचा परिणाम अनेक लोकांवर होणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न केला. केवळ पोर्तुगालमधील जन्म नोंदणीवर आधारित भारतीय पारपत्र रद्द करणे अयोग्य आहे, यावर भर देत तानावडे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना खात्याने घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

राज्यात पोर्तुगीज नागरिकत्व नोंदणीचा विषय चर्चेचा ठरला आहे. ज्या नागरिकांनी पोर्तुगीजमध्ये जन्माच्या नोंदी केल्या आहेत, ते पोर्तुगीजमधील रहिवासी झाले आहेत. परंतु मागील काही काळात पोर्तुगीज नागरिकत्वाची नोंदणी करून गोव्यातही सुविधा घेतल्याची प्रकरणे वादग्रस्त ठरली आहेत.

नूतनीकरण प्रक्रिया जलद करा!

परराष्ट्र खाते या व्यक्तींना पोर्तुगीज सरकारकडून अधिकृत नागरिकत्वाचे दस्तऐवज प्राप्त होईपर्यंत भारतीय पारपत्रांचे नूतनीकरणाची परवानगी देते. पोर्तुगीज पारपत्र तयार होईपर्यंत त्यांच्या प्रवासाच्या सोयीसाठी ते आवश्‍यक आहे. मंत्रालयाने पारपत्र नूतनीकरणाची प्रक्रिया जलद करावी, ज्यामुळे व्यक्तींना पोर्तुगीज नागरिकत्व प्राप्त झाल्यावर त्वरित ओआयसी कार्ड मिळू शकेल. विशेषत: आपल्या मतदारसंघातील लोक पोर्तुगीज पारपत्रासाठी अर्ज करतात. परंतु या प्रक्रियेत अनेकदा विलंब होतो, असे सिक्वेरा म्हणाले.

भूमिका स्वागतार्ह

तानावडे यांनी राज्यसभेत आज गोमंतकीय जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असलेल्या पोर्तुगीज पासपोर्टसंबंधी विषय मांडला. तानावडे यांनी पासपोर्ट तसेच नागरिकत्वासंबंधीच्या महत्त्वाच्या समस्येचे निराकरण केले आहे, असे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT