गोमंतकीय खलाशाला वैद्यकीय उपकरणे व औषध प्रदान करताना केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा खलाशी असोसिएशनचे अध्यक्ष फ्रॅंक व्हिएगश, फा. डोएल डायस व इतर पदाधिकारी. Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीय खलाशांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी असे आश्वासन दिले आहे. खलाशा संदर्भातील जी आव्हाने आहेत ती सोडविण्याचा आपण प्रयत्न करणार. खलाशांसाठी गोवा सरकारने ज्या योजना सुरु केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोविडमुळे (Covid 19) गोमंतकीय खलाशी आपल्या घरीच आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याची जाणिव आपल्याला आहे. सद्या आपल्याकडे पर्यटन, नौवहन, जलमार्ग व बंदर ही खाती असल्याने खलाशांचे सर्व प्रश्न (questions of the sailors) तातडीने सोडविणे शक्य आहे असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Union Minister of State Shripad Naik) यांनी सांगितले.

गोवा खलाशी असोसिएशनने आज मडगावी खलाशांना वैद्यकीय उपकरणे व औषधे देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री बोलत होते.

कोविडच्या काळात लोकांनी माणुसकीचे दर्शन घडविले. लोकाना जिवनाचा खरा अर्थ समजला. डॉक्टर, पारिचारिका, पोलिस, इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी स्वताचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. अजुनही कोविड महामारी संपलेली नाही. लोकांनी गत सालापासुन घेत असलेल्या अनुभवातुन सर्वांनी स्वताची काळजी ध्यावी असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.

खलाशा संदर्भातील जी आव्हाने आहेत ती सोडविण्याचा आपण प्रयत्न करणार. खलाशांसाठी गोवा सरकारने ज्या योजना सुरु केल्या आहेत, त्याबद्दल आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करुन त्या कायमस्वरुपी करणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले.

सीडीएस परवान्यामुळे खलाशांना आपल्या कामावर रुजु होणे शक्य नाही. रविवारी आपण नवी दिल्लीत जाऊन मंत्रालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे चर्चा करुन हा प्रश्नही सोडवू असेही नाईक यांनी स्पष्ट केले.

तत्पुर्वी ज्या 75 खलाशांना सीडीएसमुळे त्रास झाला आहे त्यांच्या प्रश्न तातडीने सोडवावा अशी विनंती करणारे पत्र गोवा खलाशी असोसिएशनतर्फे केंद्रीय मंत्र्यांना असोसिएशनचे अध्यक्ष फ्रॅंक व्हिएगश यांनी दिले.

या प्रसंगी गोव्यातील 1200 खलाशांना कोविड वैद्यकीय उपकरणे व औषधे देण्याच्या योजनेचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. जे कीट खलाशांना देण्यात येणार आहे त्यांत 3500 रुपयांची उपकरणे व औषधांचा समावेश आहे. शिवाय 15 ऑक्सिजन सिलिंडर व 10 व्हीलचेअर्स खलाशांच्या उपयोगासाठी गोवा खलाशी असोसिएशनने उपलब्ध केली आहेत. ही संपुर्ण योजना 50 लाख रुपयांची असुन त्यास सिफेरर्स इंटरनॅशनल रिलीफ फंड व आंतरराष्ट्रीय सेलर्स असोसिएशनचे आर्थिक पाठबळ मिळाले आहे.

गोव्यातील खलांशांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी तत्परता दाखविल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. अनिवासी भारतीय कमिशनर अॅड. नरेंद्र सावईकर व संचालक अँथनी डिसोझा यांचे या वेळी आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित नुवेचे पॅरिश फादर डोेएल डायस यांनी या उपक्रमाला आशिर्वाद दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT