Goa Cyber Crime: गोव्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी २०१८ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत नोंदवलेल्या एकूण ११२ प्रकरणांतून केवळ ३८ प्रकरणे निकाली काढण्यात गोवा पोलिसांनी यश आले.
इतर गुन्ह्यांचा तपास अजूनही सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे हाच यावर उत्तम उपाय आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
बनावट ‘सोशल मीडिया प्रोफाइल’चा वापर पीडितांचा सहसा रोमँटिक कोनातून विश्वास संपादन करण्यासाठी केला जात आहे. या सायबर गुन्ह्यांतील पीडितांकडून नंतर पैसे उकळण्यासाठी प्रयत्न केले जातात.
काहींचे सोशल मीडिया खाते हॅक करून आणि तेथे अश्लील मजकूर किंवा बनावट आर्थिक पोस्ट केल्या जातात.
अनेकजण याला बळी पडल्याच्या घटनाही नोंद होत आहेत. काही व्यक्तींना त्यांचा वन-टाइम पासवर्ड उघड करून फसवले जात आहे.
आम्ही स्वतः सतर्क राहण्याची आज वेळ आलेली आहे. माझ्या ऐकण्यात असे अनेक किस्से आले आहेत, ज्यात लोकांना अश्लिल व्हिडिओ पाठवून नंतर त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते.
मुलींना सोशल मीडियावर त्यांचा विश्वास संपादन करून नंतर ब्लॅकमेल केले जाते. आम्हाला स्वतः आपली जबाबदारी घेऊन सोशल मीडियाचा वापर करायला हवा.
- सिसिल रोड्रिग्ज, सामाजिक कार्यकर्ता
आपण आमच्या स्मार्टफोनमध्ये अँटी व्हायरस सामावून घेतला, तर 90टक्के सायबर गुन्हे कमी करता येतील. लोकांनी कुठल्याही अनोळखी माणसाने पाठवलेली लिंक उघडण्यापूर्वी विचार करावा. सतर्कता असेल तरच फसवणूक होणार नाही. अन्यथा आपण बळी पडू शकतो.
- आदित्य देसाई, सदस्य, रिव्हॅल्युशनरी गोवन्स
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.