ED Raid Kolkata: कोळसा घोटाळ्याचं 'गोवा कनेक्शन'! I-PAC वरील धाडीनं ममता बॅनर्जींचा हाय-व्होल्टेज ड्रामा; कोलकात्यात तणावाचं वातावरण

Coal Scam Goa Election Connection: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच कोलकात्यात एक मोठी राजकीय खळबळ उडाली.
Mamata Banerjee reaction on ED
Mamata Banerjee reaction on EDDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच कोलकात्यात एक मोठी राजकीय खळबळ उडाली. प्रख्यात राजकीय सल्लागार संस्था 'I-PAC' च्या सॉल्ट लेक येथील कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) धाड टाकली. या कारवाईने बंगालचे राजकीय वातावरण चांगलेच तापले. विशेष म्हणजे, कारवाई सुरु असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांवर निशाणा साधला.

काय आहे गोवा कनेक्शन?

दरम्यान, ED कारवाईच्या केंद्रस्थानी 2022 ची गोवा विधानसभा निवडणूक आली. कोळसा घोटाळ्यातील मुख्य आरोपी अनूप माझी याने घोटाळ्यातील पैसा 'मनी लॉन्ड्रिंग'द्वारे गोव्यात पाठवल्याचा ED चा आरोप आहे. तपासातून समोर आले की, 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रचाराची जबाबदारी I-PAC कडे होती.

ED च्या सूत्रांनुसार, अनूप माझी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोळसा घोटाळ्यातील पैसा बेकायदेशीर मार्गाने गोव्याकडे वळवला आणि हाच पैसा TMC च्या निवडणूक प्रचारासाठी I-PAC ला देण्यात आला. अनूप माझीने TMC च्या निवडणूक कामासाठी हे पेमेंट केल्याचा संशय असल्यानेच आज I-PAC च्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला.

Mamata Banerjee reaction on ED
Mamata Banerjee: राम, वाम आणि श्याम एकत्र आले… ममता बॅनर्जी पुन्हा बरसल्या

प्रशांत किशोर आणि प्रतीक जैन यांचा संबंध

I-PAC ही देशातील एक मोठी राजकीय सल्लागार फर्म आहे, जिची स्थापना प्रशांत किशोर (PK) यांनी 2014 मध्ये केली होती. 2021 मध्ये प्रशांत किशोर यांनी या संस्थेतून अधिकृतपणे निवृत्ती घेतली आणि सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर आयआयटी बॉम्बेचे स्कॉलर प्रतीक जैन, ऋषी राज सिंह आणि विनेश चंदेल ही संस्था चालवत आहेत. प्रतीक जैन हे निवडणूक रणनीतीमधील दिग्गज मानले जातात. 2019 पासून I-PAC सातत्याने TMC साठी काम करत आहे आणि 2021 मधील TMC च्या विजयात या संस्थेचा मोठा वाटा मानला जातो.

Mamata Banerjee reaction on ED
Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात; डोक्याला दुखापत

ममता बॅनर्जींचा थेट हस्तक्षेप आणि गंभीर आरोप

ED ची टीम सॉल्ट लेकच्या गोदरेज वाटसाइड बिल्डिंगमध्ये छापेमारी करत असतानाच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिथे पोहोचल्या. त्यांनी या कारवाईला "राजकीय सूडबुद्धी" असे संबोधले. ED चे अधिकारी कागदपत्रांची तपासणी करत असताना ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, "केंद्रीय यंत्रणा TMC ची महत्त्वाची कागदपत्रे चोरण्यासाठी आली आहे." यानंतर त्यांनी स्वतः कार्यालयातील काही महत्त्वाच्या फाईल्स उचलल्या आणि त्या आपल्या ताफ्यातील गाडीत ठेवण्यास सांगितल्या. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे कोलकात्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Mamata Banerjee reaction on ED
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवरील व्यंगचित्र फॉरवर्ड करणाऱ्या प्राध्यापकाची तब्बल 11 वर्षानंतर सुटका

राजकीय परिणाम

कोळसा घोटाळ्याचा पैसा गोव्यातील निवडणुकीत वापरल्या गेल्याच्या आरोपाने TMC च्या प्रतिमेला गोव्यातही (Goa) धक्का बसण्याची शक्यता आहे. गोव्यातील स्थानिक राजकीय पक्षांनीही आता या प्रकरणावरुन TMC ला घेरण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, भाजपने या कारवाईचे समर्थन करत भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढली जातील, असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com