Iran Protest: "काहीही झालं तरी झुकणार नाही" अयातुल्ला खामेनेईंचा ट्रम्प यांच्यावर जोरदार प्रहार; जागतिक राजकारणात खळबळ

Ayatollah Ali Khamenei Speech Iran: अयातुल्ला अली खामेनेई यांनी शुक्रवारी (9 जानेवारी) देशाला संबोधित करताना पाश्चात्य देशांवर आणि विशेषतः अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली.
Ayatollah Ali Khamenei Speech Iran
Ayatollah Ali KhameneiDainik Gomantak
Published on
Updated on

Ayatollah Ali Khamenei Speech: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी शुक्रवारी (9 जानेवारी) देशाला संबोधित करताना पाश्चात्य देशांवर आणि विशेषतः अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. "इस्लामी प्रजासत्ताक विदेशी शक्तींसाठी 'भाडोत्री सैनिक' म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना कदापि सहन करणार नाही," अशा कडक शब्दांत त्यांनी इशारा दिला. इराणमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे निदर्शक केवळ अमेरिकेला खुश करण्यासाठी हे कृत्य करत असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.

डोनाल्ड ट्रम्प यांना आरसा दाखवला

अयातुल्ला खामेनेई यांनी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना थेट लक्ष्य केले. ट्रम्प यांनी इराणमधील परिस्थितीवर भाष्य केल्यानंतर खामेनेई म्हणाले की, "ट्रम्प यांनी इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या देशातील गंभीर समस्यांची चिंता करावी. इराण कोणत्याही परकीय दबावाखाली झुकणार नाही." खामेनेई यांच्या मते, इराणमधील काही दंगलखोर सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करुन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देशाच्या सार्वभौमत्वासाठी धोकादायक आहे.

Ayatollah Ali Khamenei Speech Iran
Donald Trump Warship: ट्रम्पचा धमाका! तयार करणार जगातील सर्वात मोठी युद्धनौका; वाचा थरकाप उडवणारी माहिती

युवाशक्तीला ऐक्याचे आवाहन

देशातील तरुणांना संबोधित करताना खामेनेई यांनी भावनिक साद घातली. "इराणच्या तरुणांनी देशात एकता राखणे काळाची गरज आहे. कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी सज्ज राहा, कारण एकजूट असलेले राष्ट्र कोणत्याही शत्रूला पराभूत करु शकते," असे ते म्हणाले. आपल्या देशाचे आणि लोकांचे संरक्षण करणे हे आक्रमण नसून साम्राज्यवादासमोर दाखवलेले सर्वात मोठे धाडस आणि शौर्य आहे, अशा शब्दांत त्यांनी इराणच्या प्रतिकार शक्तीचे समर्थन केले.

शत्रूला मोजावी लागणार मोठी किंमत

इराणमध्ये (Iran) सुरु असलेली निदर्शने ही उत्स्फूर्त नसून ती अमेरिका आणि इस्रायल पुरस्कृत एक मोठा विदेशी कट असल्याचा पुनरुच्चार खामेनेई यांनी केला. 'एपी'च्या (AP) वृत्तानुसार, खामेनेई यांनी अत्यंत कठोर शब्दांत ताकीद दिली की, जे निदर्शक दुसऱ्या देशाच्या नेत्याला खुश करण्यासाठी स्वतःच्याच देशातील रस्ते आणि मालमत्ता उद्ध्वस्त करत आहेत, त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. "मी सध्या जे सांगत आहे त्यापेक्षाही कडक शब्दांत मी हे स्पष्ट करु इच्छितो की, जर हे प्रकार थांबले नाहीत, तर त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल," असा सज्जड दम त्यांनी दिला.

Ayatollah Ali Khamenei Speech Iran
Donald Trump Dance: मलेशियात उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका! सोशल मीडियावर 'तो' भन्नाट डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का? VIDEO

इराणमधील सध्याची परिस्थिती आणि पाश्चात्य जगासोबत असलेला अण्वस्त्र करार व इतर राजनैतिक वाद या पार्श्वभूमीवर खामेनेईंचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे इराण सरकार आता अंतर्गत निदर्शकांविरुद्ध अधिक कठोर पावले उचलण्याचे संकेत मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com