Nagnath Mahadev Temple Theft: पर्रा येथील नागनाथ महादेव मंदिरात तिसऱ्यांदा चोरी; 30 हजारांची रोकड लंपास, मूर्तीचीही विटंबना

Nagnath Mahadev Temple in Parra: उत्तर गोव्यातील पर्रा येथील लिंगाभट परिसरातील प्रसिद्ध नागनाथ महादेव मंदिरात पुन्हा एकदा चोरीची धक्कादायक घटना घडली आहे.
Nagnath Mahadev Temple Theft
Nagnath Mahadev Temple TheftDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: उत्तर गोव्यातील पर्रा येथील प्रसिद्ध नागनाथ महादेव मंदिरात पुन्हा एकदा चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दानपेटीतील सुमारे ३० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे, या मंदिरात चोरी होण्याची ही दोन-तीन वर्षांतील तिसरी वेळ असल्याने भाविकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून दानपेटी फोडली आणि त्यातील सर्व रोकड पळवली.

केवळ चोरीच नव्हे, तर नराधमांनी मंदिरातील देवमूर्तीचीही विटंबना केली आहे. यामुळे स्थानिक लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. सकाळी जेव्हा पुजारी आणि काही भाविक मंदिरात आले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

Nagnath Mahadev Temple Theft
Goa Traffic Police: 'बेशिस्त' वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका! वर्षभरात 94 लाखांहून अधिक दंड वसूल; 5,025 जणांवर कारवाई

एकाच मंदिरात तिसऱ्यांदा चोरी

पर्रा येथील या महादेव मंदिरात यापूर्वीही दोनदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. एकाच धार्मिक स्थळाला वारंवार लक्ष्य केले जात असल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "वारंवार तक्रार करूनही जर मंदिरात सुरक्षा व्यवस्था नसेल, तर चोरट्यांना मोकळे रान मिळते," अशा प्रतिक्रिया संतप्त ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. या घटनेमुळे परिसरातील इतर मंदिरांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

Nagnath Mahadev Temple Theft
Goa Crime: टॉवेल आणण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार; 75 वर्षीय गुन्हेगाराला सश्रम कारावासाची शिक्षा

तपासासाठी पोलिसांची चक्रे फिरली

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरी आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com