Revolutionary Goans : कसणाऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा डाव; केरी - उसगावातील भूमिपुत्रांवर अन्याय

शेतकऱ्यांनी मांडली कैफियत: ‘आरजी’चा शेतकऱ्यांना पाठिंबा
Revolutionary Goans
Revolutionary GoansDainik Gomanatak
Published on
Updated on

Revolutionary Goans कृषी उत्पादनातून संसार चालवणाऱ्या भूमिपुत्रांवर राज्यात अन्याय होत असून कसणाऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याच्या या प्रयत्नांमुळे गोमंतकीय सध्या हवालदिल झाला आहे.

या राज्यात सरकार नावाची चीज आहे की नाही, असा सवाल त्यामुळेच उपस्थित होत असल्याने असे प्रकार होऊ नयेत, भूमिपुत्रांवर अन्याय होता कामा नये यासाठी सरकारने कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातर्फे करण्यात आली आहे.

राज्यात सध्या एका दिवसाचा क्रांतिदिन न होता, राज्यातील समस्या सोडवण्यासाठी रोजच क्रांती व्हायला हवी, असेही आरजीचे नेते विश्‍वेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Revolutionary Goans
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाच्या किमती स्थिर; वाचा आजचे दर

फोंड्यातील क्रांती मैदानावर आज (रविवारी) आरजी पक्षातर्फे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केरी तसेच उसगावच्या भूमिपुत्रांनी आपली व्यथा मांडली.

प्रियोळ मतदारसंघातील नाळे - केरी येथील शेलावती गावडे व कुटुंबीय तसेच वाळपई मतदारसंघातील गाळवाडा - उसगाव येथील ज्ञानेश्‍वर गावडे, बिंदिया गावडे कुटुंबीयांनी आपली कैफियत मांडताना गेली कित्येक वर्षे लागवडीखाली आणलेल्या जमिनी भाटकरांकडून परस्पर विकण्याचा प्रकार सध्या घडला असल्याचे सांगितले.

Revolutionary Goans
G20 Summit Goa 2023: पर्यटन कार्यगटाची आजपासून बैठक, 20 देशांचे 150 प्रतिनिधी होणार सहभागी

विश्‍वेश नाईक, रामचंद्र गावडे तसेच आरजीच्या इतर कार्यकर्त्यांनी राज्यातील भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने भूमिपुत्रांच्या समस्या वाढत चालल्या आहेत, कसणाऱ्या हातांना जमीन नाही, बेरोजगारी वाढली आहे.

महागाईचा कळस झाला असून या सर्व समस्या सोडवण्यासाठी विद्यमान सरकारने प्रयत्न करायला हवेत, असे विश्‍वेश नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com