Rugnashraya Sanstha Dainik Gomantak
गोवा

Rugnashraya Sanstha: रुग्णाश्रय संस्था ठरतेय गोरगरिबांसाठी ‘आश्रय’

Rugnashraya Sanstha: कालापूर येथे कार्यरत : तरुण मुलामुलींना सेवा-सुश्रूशेचे प्रशिक्षण; निस्वार्थ भावनेने देतात सेवा

दैनिक गोमन्तक

Rugnashraya Sanstha: कालापूर येथील रुग्णाश्रय संस्था गोरगरीब व गरजू रुग्णांची सेवा करत आहे. उपचारासाठी रुग्णाच्या आश्रयाच्या सोयीपासून ते तरुण मुलामुलींना सुश्रूशेचे प्रशिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी गोष्टी आपणहून ही संस्था गेली अनेक वर्षे निस्वार्थ भावनेने पुरवीत आहे.

मातृछायेच्या ‘सेवा-२५’ या उपक्रमाचे पुढचे पाऊल म्हणून रुग्णाश्रय या संस्थेच्या स्थापनेकडे पाहता येईल. दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने रुग्णाश्रयाची स्वतःची वास्तू २००७ साली बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर कालापूर येथे वसंतराव धेंपो मार्गावर उभी राहिली.

पणजीतील इस्पितळात येणारे रुग्ण आणि नातेवाईक यांची तात्पुरती निवास व्यवस्था नाममात्र शुल्क आकारून येथे केली जाते. इस्पितळातील अल्प उपचारांनंतर अथवा चाचणीनंतर रुग्णांना पुन्हा बोलावले जाते, त्यावेळी त्यांची राहण्याचीही सोय आहे.

रुग्णाश्रयातील अन्य सुविधांकडे पाहता रुग्णाश्रय हा केवळ निवारा नसून तेथे अन्य उपक्रमही चालतात. रुग्णवाहिका सेवा, जयपूर फूट, फिजिओथेरपी सेंटर, साहाय्यता होम नर्सिंग अभ्यासक्रम आणि अलीकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

काही दिवस राहून रुग्ण व त्यासोबतचा नातेवाईक पुन्हा इस्पितळात जाऊ शकतो. दूरवरून येणारे अथवा ज्यांची जवळपास राहण्याची सोय नाही, त्यांना ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरली आहे.

दात्यांकडून अन्नदान

या ठिकाणी एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत २,५१० रुग्ण राहण्यास आले. त्यांच्यासोबतच्या ३,३७७ नातेवाईकांचीही राहण्याची सोय करण्यात आली, अशी माहिती रुग्णाश्रयमधल्या स्मिता कापाडी यांनी दिली. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत रुग्णाश्रयातील प्रशिक्षणार्थी, रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारीवर्ग यांना वर्षभरात ८७ हितचिंतकांनी स्वखर्चाने अन्नदान केले आहे.

‘रुग्णाश्रया’तील सुविधा

रुग्णाश्रयातर्फे या कालावधील ६१६ जणांना रुग्णवाहिका पुरविण्यात आली, त्यासाठी माफक शुल्क आकारले गेले. तसेच २३ गरजूंना मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. सुवर्णप्राशन सुविधेचा ७१ जणांनी लाभ घेतला. १०५ जणांना वैद्यकीय उपकरणे पुरविण्यात आली. विविध विकारांमुळे पाय गमावलेल्या ३८ जणांना रुग्णाश्रयातील जयपूर फूट केंद्रातर्फे जयपूर फूट पुरविण्यात आले.

साहाय्यता होम नर्सिंग

साहाय्यता होम नर्सिंग हा सहा महिन्यांचा मोफत अभ्यासक्रम रुग्णाश्रयात चालतो. यात २० मुली व मुलगे यांना मुलाखतीनंतर निवड करून प्रवेश दिला जातो. त्या सर्वांची राहण्याची व भोजनाची सुविधा येथे मोफत केली आहे. गोमेकॉ-बांबोळी येथे रुग्णांसोबत वॉर्डमध्ये प्रत्यक्ष राहून या सर्व प्रशिक्षणार्थींना रुग्णांच्या घरी राहून त्याची सुश्रूशा कशी करायची याचे शिक्षण डॉक्टर देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: कळंगुट येथील चोरीप्रकरणी एकास अटक, 3 लाखांचा मुद्देमालही जप्त!

Kartik Aaryan: ना गाजावाजा न कसाला धिंगाणा; कार्तिकने गोव्यात शांततेत साजरा केला वाढदिवस पाहा Photo, Video

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात चहा, कॉफीसारखे गरम पेय का टाळावेत?

Cash for Job Scam: त्या 'मॅडम'ला पकडून देण्याचा गोमंतकीयांनी निर्धार केलाय! Cash For Job प्रकरणावरुन सरदेसाई पुन्हा बरसले

SCROLL FOR NEXT