Goa Forward Dainik Gomantak
गोवा

Goa Forward: हॉस्पिसियोच्‍या दुरुस्तीचा निर्णय सरकारने त्‍वरित घ्‍यावा : सरदेसाई

पोलिसांच्या उपस्थितीत गोवा फॉरवर्डतर्फे रंगरंगोटी सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Forward डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी गोवा फॉरवर्डचे नेते तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मडगाव येथील हॉस्पिसियो इमारतीच्या आवारभिंतीच्या रंगरंगोटीला सुरूवात केली.

सदर काम पोलिसांच्या उपस्थितीत झाले. सरदेसाई यांच्या पत्नी उषा सरदेसाई, गोवा फॉरवर्डचे नगरसेवक तसेच कार्यकर्ते या कार्यात सहभागी झाले होते.

आमदार सरदेसाई यांनी सांगितले की, हॉस्पिसियोला इतिहास आहे. हे वारसा केंद्र आहे व त्याचे जतन व संवर्धन करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

मात्र, हॉस्पिसियोच्या दुरुस्तीसंदर्भात राज्य सरकार काहीही निर्णय घेत नाही. गेल्या तीन वर्षांपासून तर या वारसा केंद्राकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

सरकारचे या इमारतीकडे दुर्लक्ष म्हणजे अन्यायच आहे व अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्व होते. म्हणून इमारतीच्या आवारभिंतीच्या रंगरंगोटीचे काम त्यांच्या जयंतीदिनी आम्ही हाती घेतलंय, असे सरदेसाई यांनी सांगितले.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ उभारण्यामागे केवळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा हेतू होता.

मग तिथे खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार सरकार कसा काय करू शकते? पोलिसांची फौज पाठवून घाबरविण्‍याचा प्रयत्‍न केला जातोय. आम्ही भित्रे आहोत असे सरकारला वाटते काय

- विजय सरदेसाई, फातोर्ड्याचे आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT