Amit Shah In Goa: फोंडा येथे होणाऱ्या शहा यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग : फर्मागुढीत धडाडणार भाजपची मुलुखमैदान तोफ
Amit Shah
Amit ShahDainik Gomantak
Published on
Updated on

Amit Shah In Goa लोकसभा निवडणुकीला अद्याप वेळ असला तरी भाजपने प्रचाराचे रणशिंग फुंकले असून रविवारी गोव्यातल्या जाहीर प्रचाराला सुरुवात होत आहे.

सांसद प्रचार मोहिमेअंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी गोवा दौऱ्यावर येत असून फर्मागुढी-फोंडा येथे दुपारी ४ वाजता ही जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती पक्षाचे नेते ॲड. नरेंद्र सावईकर आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी दिली.

शहा यांच्याकडून विविध प्रश्‍नांची उत्तरे अपेक्षित असल्याने या जाहीर सभेकडे समस्त गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी भाजप सत्तेवर आला, तरी देशभरात पक्षाला १६० जागांवर अत्यंत कमी मतांनी पराभव पत्करावा लागला होता. यात दक्षिण गोव्याच्या जागेचा समावेश होता.

म्हणून पक्षाच्या रणनीतीनुसार या सर्व जागांवर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विशेष लक्ष देण्यात येत आहे.

याचाच भाग म्हणून ज्येष्ठ नेते अमित शहा रविवारी गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी फर्मागुढी येथे पहिलीच जाहीर सभा होत असून यात राज्यातील दोन्हीही मतदारसंघांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेला येणार आहेत.

Amit Shah
I League Football: धेंपो क्लबने एफसी गोवास नमविले

म्हादईप्रश्‍नी अमित शहा गोव्याच्या हिताचाच निर्णय घेतील : शिरोडकर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी फर्मागुढी येथे जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची म्हादई पाणी वाटपासंदर्भातील भूमिका काय, असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत.

त्यावर जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी, शहा हे राष्ट्रीय नेते असून ते गोव्याच्या हिताचा निर्णय घेतील, अशी सारवासारव केली. शिरोडकर हे आज फातोर्डा येथे एका जलसंसाधन योजनेच्या शुभारंभासाठी आले होते.

त्यावेळी ते बोलत होते. शहा या प्रश्नावर योग्य तोडगा काढतील, असे शिरोडकर म्हणाले. या मुद्द्यावर उद्या तुम्ही शहा यांच्याशी बोलणार का, असे विचारले असता, ‘नक्कीच’ असे उत्तर शिरोडकर यांनी दिले.

‘नो फ्लाय झोन’ जाहीर

या सभेसाठी फर्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर भव्य स्टेज उभारले असून त्या अनुषंगाने इतर जय्यत तयारी केली आहे.

जाहीर सभा उद्या (रविवारी) ४ वाजता सुरू होणार असून दुपारी ३ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत ५ किलोमीटरचा परिसर ‘नो फ्लाय झोन’ जाहीर केला आहे.

यादरम्यानच्या काळात या परिसरात ड्रोन व मानवविरहित हवाई वाहतुकीस बंदी घातली आहे.

Amit Shah
Cashew Festival Goa: काजू महोत्सव आता राज्य महोत्सव; 'काजू फेस्त गोवा 2023'चे पणजीत उद्धाटन

सभेनंतर भाजप नेत्यांची जंगी बैठक

या सभेसाठी 25 हजार कार्यकर्त्यांचे लक्ष्य ठेवले असून पक्षाचे पदाधिकारी, सर्व मंत्री, आमदार, चाळीसही मतदारसंघांचे मंडळ अध्यक्ष आणि सचिव उपस्थित राहणार आहेत. सभा संपल्यानंतर अमित शहा भाजपच्या सुकाणू समितीची बैठक घेतील.

या प्रश्‍नांच्या उत्तरांची गोमंतकीयांना अपेक्षा

1. म्हादई जलतंटा प्रश्‍नावर गृहमंत्री बोलणार का?

2. लोकसभेच्या उमेदवारीवर भाष्य करणार का?

3. राज्य मंत्रिमंडळातील बदलाला चालना देणार का?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com