Heat Wave Dainik Gomantak
गोवा

Heat Wave : राज्यात उष्मा वाढला, घामोळ्याने जीव होतोय हैराण; काळजी घेण्याचे आवाहन

Heat Wave : लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना घामोळे येणे आदी प्रकार वाढलेले असून घामोळ्यापासून सुटका मिळावा, तसेच काही प्रमाणात गारवा मिळावा यासाठी अनेक नागरिक समुद्रात खाऱ्या पाण्याच्या स्नानासाठी देखील जात आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Heat Wave :

पणजी, राज्यात वाढत्या तापमानामुळे उष्म्याच्या आजारातही वाढ झाली आहे. वाढत्या उष्म्यामुळे सातत्याने लागणाऱ्या घामाच्या धारांमुळे घामोळे येणे, चक्कर येणे, अशक्तपणा आदी प्रकार वाढत आहेत.

काळजी घेण्याचे आवाहन :

नागरिकांनी याबाबत योग्य ती काळजी घेणे जरुरीचे आहे. मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसानंतर पुन्हा उष्मा तसेच मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आर्द्रतेमुळे नागरिकांना खासकरून कामगारवर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच छोट्या मुलांना त्रास होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना घामोळे येणे आदी प्रकार वाढलेले असून घामोळ्यापासून सुटका मिळावा, तसेच काही प्रमाणात गारवा मिळावा यासाठी अनेक नागरिक समुद्रात खाऱ्या पाण्याच्या स्नानासाठी देखील जात आहेत.

वाढत्या उष्म्याच्या आजारांसंबंधी आरोग्य संचालनालयाचे नोडल अधिकारी डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांना विचारले असता वाढत्या उष्म्यामुळे हीट रॅश, हीट एडिमा असे प्रकार घडून येतात. उष्म्यामुळे घामोळे येणे हे प्रकार साहजिकच आहे. वाढत्या उष्म्याचा त्रास प्रामुख्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि खास करून कामगार वर्गाला होत असतो. आता शाळांना सुटी असल्याने मुलांना तसा त्रास नाही. ज्येष्ठ नागरिक जर दुपारी उन्हात आल्यास त्यांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

तापमानाचा पारा ३४.२ अंशांवर

राज्यात तापमानाचा आलेख चढता असून दिवसेंदिवस वाढलेले तापमान आणि आर्द्रतेमुळे राज्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात उष्म्याला सामोरे जावे लागत आहे. आज राज्यात कमाल ३४.२ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. जे सर्वसामान्य तापमानाच्या तुलनतेत काही अंशी अधिक आहे.

राज्यात मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज उष्मा कमी होता. आज राज्यात कमाल ८४ टक्के एवढ्या आर्द्रतेची नोंद करण्यात आली. मागील दोन दिवस राज्यातील कमाल आर्द्रता ९० टक्क्याहून अधिक होती. पुढील चार दिवस राज्यातील काही भागात आर्द्रतेमुळे अधिक उष्मा जाणविण्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे. आज पणजी येथे कमाल ३४.२ अंश सेल्सिअस तर किमान २५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

कामगारांना आवाहन ः

कामगार वर्ग उन्हात काम करत असतात, त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. कामगार आयुक्तांना यासंबंधी योग्य त्या उपाय योजना करण्यास सांगितले आहे. शक्यतो दु. १२ ते ३ या दरम्यान लहान-सहान कामे करावी किंवा काम बंद ठेवावे.

सकाळी लवकर कामे सुरू करावीत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. वाढत्या उष्म्याच्या अनुषंगाने योग्य ती पावले उचलण्यात आल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT