Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : स्थानिकांचा व्यवसाय परप्रांतियांच्या घशात घालण्याचे सरकारचे कारस्थान; सरदेसाईंचे सरकारवर टिकास्त्र

शॅक धोरणा संदर्भात लक्षवेधी सूचना आणणार

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai : स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी गोव्यातील भाजप सरकार गोव्यातील सर्व पारंपारिक व्यवसाय हायजॅक करून ते बाहेरच्या लोकांच्या घशात घालू पाहत आहे असे टिकास्त्र गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष सरदेसाई यांनी सोडले.

या विधानसभा अधिवेशनात शॅक व्यावसायिकांच्या समस्यांवर उपाय काढता यावा यासाठी शॅक धोरणा संदर्भात लक्षवेधी सूचना मांडणार असल्याची घोषणा केली.

आज शेकमालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विजय सरदेसाई यांची भेट घेऊन गोवा सरकार हे 'मॉडेल शेक' धोरण आणू पहात आहे, ते पाहिल्यास ते पारंपारिक शेकवाल्यांना विस्थापित करू पाहत आहेत अशी भिती व्यक्त केली.

यावर बोलताना सरदेसाई म्हणाले, ॲपधारीत टॅक्सी व्यवसायाच्या मार्गाने पारंपारिक टॅक्सी चालकांच्या धंद्यावर या सरकारने गदा आणली. किनारपट्टीवरील वॉटर स्पोर्टस् हा व्यवसाय त्याच प्रमाणे हे सरकार संपवू पाहत आहे आणि आता त्यांनी शॅकवाल्यांवर हात घालायचे ठरविले आहे. पारंपरिक व्यवसायांना सर्वात जास्त प्राधान्याने संरक्षण मिळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सरकार जे मॉडेल शॅक म्हणून काय आणू पाहते त्याचा खर्च एक कोटी रूपये असून असे चार शॅक गोव्यात ऊभे राहणार आहेत. या शॅक्सच्या पावणीत कुणीही भाग घेऊ शकते.

एव्हढ्या मोठ्या रकमेच्या लिलावात फक्तं तरांकित हॉटेलवालेच भाग घेऊ शकतील. असे मोठे स्पर्धक व्यवसायात आल्यास त्याचा मार पारंपारिक शॅक व्यावसायिकांना बसणार अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी यावेळी बोलताना, हे धोरण आखताना सरकारने पारंपारिक शॅक्स मालकांना विश्वासात घेतलेले नाही. असे मोठे शॅक्स आल्यास ते पारंपारिक शॅकवाल्यांच्या धंदा खाणार अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT