Dabolim Airport : महिलेची प्रकृती बिघडली; दाबोळी विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लॅन्डिंग

पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरु
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Dabolim Airport : एका 65 वर्षीय महिलेची प्रकृती अचानक बिघडल्याने शुक्रवारी सायंकाळी एका एअरलाईन कंपनीच्या विमानाचे दाबोळी विमानतळावर इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले. काही दिवसांपूर्वी या महिलेची अ‍ॅजिओप्लास्टी झाली होती. याप्रकरणी दाबोळी विमानतळ पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Dabolim Airport
Vijai Sardesai : एसटीना राजकीय आरक्षण न देणे हा या समाजावर केलेला अन्याय : विजय सरदेसाई

याबाबत अधिक माहिती अशी की, 65 वर्षीय लीला जोझेफ दुबईहून त्रिची-तामिळनाडू येथे जाणाऱ्या विमानात प्रवास करीत होत्या. यावेळी त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने विमानाचे दाबोळी विमानतळावर इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले.

विमानाचे इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आल्याने विमानतळावरील यंत्रणेची धावपळ उडाली. इमर्जन्सी लॅन्डिंगनंतर लीला यांना तत्काळ चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच लीला यांचा मृत्यु झाला.

यानंतर लीला यांचा मृतदेह मडगावातील जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात पाठवून देण्यात आला. लीला यांचा मृत्यु हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Illegal Petroleum Storage
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Exotic Wildlife Smuggling Mumbai International Airport
Dabolim Airport
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com