CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 'अयोध्ये’चे दर्शन घडविणार

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. सावंत: 22 रोजी भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: राज्य सरकार आयोजित करत असलेल्या आध्यात्मिक यात्रेअंतर्गत येणाऱ्या काळात अयोध्येतील राम मंदिराला गोमंतकीयांची भेट घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरवळे येथे केली.

हरवळे साखळी येथील रुद्रेश्वर देवस्थान येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची पत्रिका व अक्षता ठेवून साखळी मतदारसंघात या पत्रिकांच्या वितरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष तथा नगरसेवक यशवंत माडकर साखळीतील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावंत पुढे म्हणाले, 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा गोव्यातही भव्यदिव्य अशा स्वरूपात साजरा व्हावा, यासाठी सर्व गावातील रामभक्तांनी आपापल्या गावातील मुख्य मंदिरांमध्ये जमा होऊन श्री राम नाम जप करावा.

youtube.com/watch?v=bss7JiUDWoY

राम मंदिरासाठी भाजप सरकारने दिलेले आश्वासन हे भाजप सरकारने म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरे करून दाखविले आहे. हा संपूर्ण भारतीयांसाठी व जगासाठी असा गौरवास्पद सोहळा आहे. या सोहळ्याला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त व्हावे, अशी प्रत्येक राम भक्ताची अपेक्षा असून त्यासाठी ज्याप्रमाणे शिलालेख राज्यात आल्यानंतर सर्वांनी त्याचे जोरदारपणे व जल्लोषात स्वागत केले होते,

त्याच पद्धतीचा सोहळा श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी गोव्यातही साजरा व्हायला हवा. यासाठी आत्तापासून तयारीला प्रारंभ केला पाहिजे, असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सावंत यांनी रूद्रेश्वर मंदिरात आरती केल्यानंतर सन्मानाने पत्रिका मंदिरात ठेवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

Goa Fisheries Projects Pending: गोव्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला निधीचा फटका! 53 कोटी मिळाले; पण 6 वर्षांत अवघे 47 कोटीखर्च, केंद्रीयमंत्र्यांचा संसदेत खुलासा

National Education Policy Goa: पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी अन् 11वीतही 'NEP' लागू होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Assembly Three Day Session: सहा महिन्यांचा हिशेब ३ दिवसांत! विरोधी पक्षनेत्यांची टीका, 31ऑगस्‍ट ते 2 सप्‍टेंबर अल्प कालावधीचे अधिवेशन

Student Protest Firing Allegations: 'गृहमंत्र्यांनीच दिला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश!' लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाने संसदेत गदारोळ

SCROLL FOR NEXT