CM Pramod Sawant S Social Media
गोवा

पणजीत झाड कोसळून तरुणीचा मृत्यू; सरकारकडून चार लाखांची मदत जाहीर

CM Pramod Sawant: सरकारने आता पीडित आरतीच्या कुटुंबाला चार लाखांची मदत जाहीर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात बोलताना याबाबतची माहिती दिली.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांमध्ये जीर्ण झाडे पडण्याचा घटना घडत आहेत. अशातच रविवारी सकाळ राजधानी पणजीतील चर्च स्वेअर परिसरात अंगावर झाड कोसळून 19 वर्षीय आरती गोंड या तरुणीचा मृत्यू झाला. सरकारने आता पीडित आरतीच्या कुटुंबाला चार लाखांची मदत जाहीर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात बोलताना याबाबतची माहिती दिली.

दरम्यान, रामनगर-बेती येथील आरती गोंड रविवारी सकाळी पावसामुळे उन्मळून पडलेल्या झाडाखाली सापडली. त्यात ती गंभीर जखमी झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी ताबडतोब तिला बाहेर काढत 108 रुग्णवाहिकेमधून गोमेकॉत दाखल केले होते. तिच्यावर सकाळपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान संध्याकाळी तिचा मृत्यू झाला.

सभागृहात बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्यातील लोकप्रतिनिधींनी आपपल्या भागामधील धोकादायक झाडे किंवा फांद्याची माहिती तात्काळ उपजिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी. त्यानंतर उपजिल्हाधिकारी अशा झाडांची पाहणी करुन धोकादायक झाडे तोडण्याचा निर्णय घेतील.

बाबुश मोन्सेरात यांचे निर्देश

झाड पडून युवतीच्या मृत्यूची घटना दुर्दैवी. मी लोकांना विनंती करतो की त्यांनी जीर्ण झाडांबाबतीत खबरदारी बाळगावी व अशा झाडांखाली वाहने लावू नयेत. वन खात्याकडून राजधानी पणजीतील (Panaji) धोकादायक झाडांबाबत अहवाल मागवून घेण्यासंबंधी मी पणजी महापालिकेच्या आयुक्तांना निर्देश दिले आहेत, असे पणजीचे आमदार मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT