Goa Assembly Election

 
Dainik Gomantak
गोवा

...म्हणून गोवा विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी: जुझे फिलिप डिसोझा

'गोवा विधानसभा निवडणूक राज्यात वाढत असलेल्या कोविड-19 महामारी बरोबर ऑमिक्रोन विषाणूमुळे पुढे ढकलावी', अशी विनंती गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा (Juze Philip D'Souza) यांनी केली.

दैनिक गोमन्तक

Goa Elections: 'गोवा विधानसभा निवडणूक राज्यात वाढत असलेल्या कोविड-19 महामारी बरोबर ऑमिक्रोन विषाणूमुळे पुढे ढकलावी', अशी विनंती गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा (Juze Philip D'Souza) यांनी केली. गेल्या काही दिवसात गोवा वैद्यकीय इस्पितळाबरोबर इतर सरकारी इस्पितळात रुग्ण वाढत असल्याने, राज्य निवडणूक आयुक्तांनी विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) काही काळापर्यंत पुढे ढकलावी, अशी मागणी डिसोजा यांनी केली.

गोव्यात पुढील दिल्लीत होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणूक राज्यात वाढत असलेला कोविड-19 (Covid-19) विषाणूमुळे पुढे ढकलावी, तसेच ऑमिक्रोन (Omicron) विषाणूचा फैलाव सुद्धा गोव्यात झाला असल्याने राज्य निवडणूक आयुक्तांनी नागरिकांचा जीवनाच्या रक्षणासाठी काही काळापर्यंत विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी अशी विनंती राज्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयी जातीने लक्ष घालून वाढत्या कोरोना विषाणूमुळे राज्यात होणारी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करावे. राज्यात गेल्या दोन दिवसापासून कोरोना विषाणूमुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हा विषय गंभीर असून राज्य निवडणूक आयुक्तांनी याप्रकरणी विचार विनिमय करून तात्पुरते विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी जुझे फिलिप डिसोझा यांनी केली.

पुढे माहिती देताना जुझे फिलिप डिसोझा म्हणाले की, 'गेल्या वर्षी राज्यात पालिका निवडणुकीनंतर अनेक जण कोरोना बाधित झाले होते. त्यावेळी अनेकांचे करोना विषाणू मुळे निधन झाले होते. तसेच कोरोना रूग्णात वाढ झाल्याने केंद्र सरकार बरोबर राज्य सरकारला खूपच त्रास सहन करावा लागला होता. सरकारी इस्पितळात ऑक्सिजनचीही कमतरता भासल्याने सुद्धा हजारो करोना रुग्णाचे निधन झाले होते. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व राज्य निवडणूक आयुक्तांनी विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी अशी विनंती फिलिप डिसोझा यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT