कोरोनाचा चढता आलेख; मागील काही दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या...

कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर होत आहे. यातच आज तब्बल 1002 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
Covid-19

Covid-19

Dainik Gomantak

Published on
Updated on

Covid-19: जसा डिसेंबर महिना जवळ येतो तशी गोव्यामध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागते. याहीवर्षी 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या (New Year) स्वागतासाठी गोव्यात देशी-परदेशी अश्या असंख्य पर्यटकांची अफाट गर्दी पाहायला मिळाली.. परिणामी दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या (Covid-19) संख्येत आपल्याला वाढ होताना दिसत आहे.

<div class="paragraphs"><p>Covid-19</p></div>
Goa Corona Report: राज्यात नव्या 592 कोरोना रुग्णांची नोंद; दोघांचा मृत्यू

सरकारने आपल्यापरीने सर्व उपाययोजना करूनही रुग्णसंख्येचा आलेख मात्र चढताच आहे. जी रुग्णसंख्या काही दिवसांमगे दोन अंकात येत होती त्याचाच आकडा आज चार अंकी रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. आज तब्बल 1002 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुका (Goa Assembly Elections 2022) तोंडावर असताना वाढत चाललेला कोरोनाचा आकडा यावर सरकार नेमकी काय पावले उचलणार ही पाहणे अत्यंत महत्वाचे आहे.

कोविडच्या सध्याच्या परिस्थितीवर 'गोमन्तक'ने गोव्यातल्या जनतेशी संपर्क साधला असता, अनेकांनी यावर आपली परखड मते व्यक्त केलीत. काहीजणांच्या मते गोव्यातील कसिनो, पार्ट्या काही काळासाठी बंद झाल्या पाहिजेत, काहींच्या मते निवडणुकीच्या प्रचारसभा, मेळावे रद्द झाले पाहिजेत. काहींनी नाईट कर्फ्यू (Night Curfew), लॉकडाऊनची (Lockdown) देखील मागणी केली, तर काही नागरिकांच्या मते यावर आपण स्वत:च नियमांचे पालन केले पाहिजे असे सांगण्यात आले.

<div class="paragraphs"><p>Covid-19</p></div>
गोव्याच्या महिलांनी टीएमसीच्या थापांना बळी पडू नये: मुख्यमंत्री

एकीकडे वाढती कोविड-ओमिक्रॉनची (Omicron) संख्या, येऊ घातलेली निवडणूक आणि दुसरीकडे जनतेचे भले, या सगळ्यात सरकारची भूमिका काय असणार, सरकार नाईट कर्फ्यू/ लॉकडाऊन लावणार का? की वेगळ्या बाजूने या परिस्थितीवर मात करणार याची उत्सुकता नगरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com