Goa Mine Dainik Gomantak
गोवा

Goa Mine: कपात धोरणामुळे डिचोलीत ‘सेझा’ कामगार संतप्त

आमदारांसह पालिका मंडळासमवेत बैठक, रस्त्यावर उतरण्याचा इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mine सेवेत रुजू करून घेण्यासाठी वेदांता कंपनीने लादलेल्या काही अटींमुळे डिचोलीतील ‘सेझा’चे कामगार अस्वस्थ झाले असतानाच, आता कामगारांना घरी पाठविण्याची तयारी वेदांता कंपनीने चालवली आहे.

कंपनीच्या या निर्णयामुळे पूर्वाश्रमीच्या सेझा कामगारांत खळबळ माजली आहे. आमच्यावर अन्याय करून वेदांता कंपनीने खाण सुरु केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू,.

आमचा प्रश्न सुटेपर्यंत खाण सुरू करू देणार नाही, असा इशारा ‘सेझा’च्या पूर्वाश्रमीच्या कामगारांनी दिला आहे. प्राप्त माहितीनुसार, कंपनीने २०२ कामगारांना रिट्रेचमेंट नोटीसही दिली आहे. त्यामुळे कामगारांत संताप पसरला आहे.

घरी बसण्याची पाळी येणार असल्याने विवंचनेत सापडलेल्या कामगारांनी आज रात्री आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये तसेच पालिका मंडळासोबत बैठक घेतली.

या बैठकीस नगराध्यक्ष कुंदन फळारी व नगरसेवक उपस्थित होते. कायदा सल्लागार ॲड. अजय प्रभूगावकर यांच्यासह दीडशे कामगार या बैठकीस उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना भेटू: शेट्ये

या कामगारांनी आपली कैफियत आमदार डॉ. शेट्ये आणि पालिका मंडळासमोर मांडली. आम्हाला घरी पाठवून खाण सुरू केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा इशारा संतप्त कामगारांनी दिला.

आमदार डॉ. शेट्ये यांनी कामगारांची बाजू ऐकून घेतली. याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार डॉ. शेट्ये यांनी कामगारांना दिले. कामगारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे राहणार, असेही आमदारांनी स्पष्ट केले.

अटी अमान्य: वेदांता कंपनीने पूर्वीच्या सेझा कामगारांना सेवेत रुजू करुन घेण्याची तयारी दर्शवताना काही अटी घातल्या आहेत.

मात्र, दहा अटींपैकी बदलीचे धोरण, आणि आऊटसोर्सिंग या अटी कामगारांना मान्य नाहीत. या अटी मागे घेऊन पूर्वीच्याच अटी कायम ठेवावेत, अशी मागणी या कामगारांची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT