Subhash Shirodkar: 'डिचोलीतील जनतेने पाण्याची चिंता करु नये'; जलस्रोत खात्याचे मंत्री म्हणाले, पडोसे प्रकल्प..

प्रकल्पात समाधानकारक पाणी पुरवठा असल्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
Subhash Shirodkar
Subhash ShirodkarDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News पाऊस सक्रिय झाल्यामुळे आता पाण्याची चिंता मिटली असून, धरणांच्या जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळीही वाढू लागली असून, पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातील जलसाठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले.

डिचोली तालुक्यातील जनतेने पाण्यासाठी घाबरून जावू नये. आज (शनिवारी) सायंकाळी कासारपाल येथे एका कार्यक्रमानिमित्त मंत्री सुभाष शिरोडकर आले असता, पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत त्यांना विचारले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

Subhash Shirodkar
Goa Petrol-Diesel Price: टाकी फुल्ल करण्याआधी जाणून घ्या इंधनाचे दर; वाचा आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती

अंजुणे धरणातील जलसाठ्यात घट झाल्याने पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणी पुरवठ्यावर परिणाम जाणवत होता.

वास्तविक अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या पडोसेतील प्रकल्पात आता अस्नोड्यातूनच पाणी पुरवठा करावा, अशी मागणी पुढे आली होती.

गुरुवारी आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही पडोसे प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर या प्रकल्पात अस्नोड्यातून पाणीपुरवठा करण्याची गरज असल्याचे म्हटले होते.

Subhash Shirodkar
Kadamba Transport Corporation: ‘माझी बस' योजनेवर खासगी बस मालक संघटनेने उपस्थित केले 'हे' प्रश्न; म्हणाले, या योजनेत आम्ही...

आज (शनिवारी) सायंकाळी आपण पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली असून, या प्रकल्पात समाधानकारक पाणी पुरवठा असल्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

जलशुद्धीकरण प्रकल्पातून सुरळीत पाणी पुरवठा होण्याकरता अधूनमधून प्रकल्पाला भेट द्या. अशी सूचनाही मंत्री सुभाष शिरोडकर यांनी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com