Fishing in goa Dainik Gomantak
गोवा

मासेमारी बंदी संपली; पुन्हा कामगारांची प्रतीक्षा!

माशांचे दर चढेच : गणेश चतुर्थीनंतर पूर्ण क्षमतेने सुरू होणार मासेमारी

दैनिक गोमन्तक

प्रसाद सावंत

पणजी: सोमवारी 1 ऑगस्टपासून राज्यात नव्याने मासेमारी हंगामाला सुरुवात होत असली तरी हवामानातील बदल आणि कामगारांच्या अभावामुळे प्रत्यक्षात ट्रॉलर्स गणेश चतुर्थीनंतर पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. 1 जूनला सुरू झालेली मासेमारी बंदी 31 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. यासाठी मच्छीमार खात्याकडूनही तयारीला सुरवात करण्यात आली आहे. खात्याचे अधिकारी एकूणच परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

(fishing ban that started on June 1 will end on July 31 in goa)

सध्या सुट्टीवर गेलेले परराज्यांतील कामगार अजूनही परतलेले नाहीत. तसेच हवामान योग्य नसल्याने मोठे ट्रॉलर्स सप्‍टेंबर महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना महामारीमुळे मासेमारीच्या गेल्या दोन हंगामांवर विपरित परिणाम झाला होता. त्यातच डिझेल, शिधा यांचे दर वाढल्याने याचा फटका मासेमारी उद्योगाला बसला. कोरोना काळात कामगारांच्या उदरनिर्वाहाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. परंतु, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने हंगामाची तयारी जोरात सुरू आहे.

गोव्यातील बहुतांश ट्रॉलर्सवर काम करणारे कामगार हे बिहार, ओडिशा, झारखंड, तामिळनाडू या राज्यांतून येत असल्याने ते मासेमारी बंदीचा काळ संपला, तरी उशिराच परततात. बिगर गोमंतकीय कामगारांवर ट्रॉलर्स अवलंबून असल्याने त्यांच्याशिवाय ते सुरू होऊ शकत नाहीत. त्यामुळे गणेश चतुर्थी झाल्यानंतर ट्रॉलर्स पूर्ववत सुरू होतील, असे सांगण्यात येते. ट्रॉलर्स मासेमारीसाठी समुद्रात जाणार की नाही, हे हवामानावर निर्धारित असते. त्यामुळे बंदी संपल्यानंतर सहसा मोठे पर्स सीनर ट्रॉलर्स लगेच मासेमारीसाठी जात नाहीत. त्यासाठी हवामान पूरक लागते. आवश्‍यक पाण्याचा प्रवाह आवश्‍यक आहे. त्यासाठी सप्टेंबरमध्ये चतुर्थीनंतर हे मासेमारी करायला सुरू करतात. दरम्यान, कामगार परतल्यास लहान ट्रॉलर्स मासेमारीसाठी जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT