Goa Assembly Session Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: अधिवेशनाचा पहिला दिवस 'या' कारणामुळे गाजला

अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस बऱ्याच विषयांवर लक्षवेधी ठरला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Session अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस बऱ्याच विषयांवर लक्षवेधी ठरला. गोव्याची राजधानी पणजीतील सर्व सरकारी इमारतींवर सोलर पॅनेल बसवणार असल्याची माहिती वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज सोमवारी विधानसभा अधिवेशनात बोलताना दिली.

त्यानंतर पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी गोव्यातील वॉटरस्पोर्ट्ससमोर महाराष्ट्रातील मालवणचे मोठे आव्हान उभे राहिले असल्याची चिंता व्यक्त केली.

त्यानंतर राहुल गांधी यांनी चार हजार किमीची भारत जोडो यात्रा पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव युरी आलेमाव यांनी मंडल परंतु विधानसभेने तो मान्य करण्यास नकार दिला.

दरम्यान विधानसभेत किरकोळ वादाचा प्रसंग पाहायला मिळाला. या घटनेत मंत्री रोहन खंवटे आणि आमदार मायकल लोबो हे आमनेसामने पाहायला मिळाले.

काळे सूट घालून येणारे परप्रांतीय लोक राज्यातील पर्यटन धोरण ठरवत असल्याचा दावा लोबो यांनी केल्यावर सभागृहात एकच गोंधळ उडाला. यावर खंवटे यांनी लोबो यांना त्या व्यक्तींची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले.

त्यानंतर लोबो यांच्या विधानावर प्रतिहल्ला करत खंवटे म्हणाले की, 'काळे सूटववाल्यांना काही जण जवळ करतात आणि आपली खासगी जमीन विकण्याचे प्रयत्न करतात. मात्र पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी पर्यटन उद्योगातील घटकांना घेऊनच धोरण निश्‍चित केले जाईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT