Fire Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa: कुठ्ठाळी नावतातील आग अजूनही धुमसतेय, नौदलाकडून शर्थीचे प्रयत्न

दाट झाडीमुळे अग्निशमनचे वाहन घटनास्थळी पोहोचण्यात अडचण

गोमन्तक डिजिटल टीम

Fire In Goa कुठ्ठाळी नावता येथे डोंगराळ भागात आग लागल्याची घटना काल रात्री घडली असून अग्निशमन दल तसेच नौदलाकडून आग विझविण्यास अथक परीश्रम चालू आहे. डोंगराळ भाग असल्याने अग्निशमन दलाला अडचणीचा सामना करावा लागत असल्याने नौदलाची मदत घेणे भाग पाडले.

या ठिकाणी दाट झाडी असल्यामुळे अग्निशमनचे वाहन घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्यामुळे बुधवारी सकाळपासून नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे पाणी फवारले जात आहे. बुधवारी दुपारी अग्निशमन दलाच्या मदतीसाठी एका व्यवस्थापनाने आपले 50 कामगार दिले.

राज्यात आग लागण्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली असून आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून असून मागील चार पाच दिवसात 20 हून अधिक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यात दुकाने, फॅक्टरी, जंगल, आंबा-काजू बागा यासह मोकळ्या माळरानावर आग लागण्याची घटना घडत आहेत.

मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी नावता येथे डोंगराळ भागात आग लागल्याची घटना काल रात्री घडली. ही आग काल रात्री लागल्याचे उघडकीस आली असता अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग लागल्याच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला असता डोंगराळ भाग असल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागला. त्यांनी मिळेल तिथे आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही.

याची माहिती कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास यांना मिळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीचा आढावा घेतला व त्यांनी नौदलाला याची माहीती दिली असता नौदलाच्या हेलीकॉप्टरद्वारे फेऱ्या मारून पाण्याचे फवारे मारण्यात आले. घटनास्थळी उपजिल्हाधिकारी, मामलेदार व संबंधीत अधिकाऱ्यांनी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्यान आजही आग नियंत्रणात आली नसल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे. अग्निशमन दलाकडून तसेच नौदलाकडून आग विझविण्यास अथक परिश्रम चालू आहेत. या ठिकाणी दाट झाडी असल्यामुळे अग्निशमनचे वाहन घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्यामुळे बुधवारी सकाळपासून नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे पाणी फवारले जात आहे. बुधवारी दुपारी अग्निशमन दलाच्या मदतीसाठी एका व्यवस्थापनाने आपले 50 कामगार दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT