Save Mhadei Save Goa: लोकांच्या उद्रेकाची वाट पाहू नका, अन्यथा...

राज्यातील वणव्याप्रश्नी सरकारवर हल्लाबोल
Press
Press Dainik Gomantak

Save Mhadei Save Goa गेल्या 50 वर्षात म्हादई जंगल परिसरात आग लागल्याची एकही घटना घडलेली नाही. नुकतीच घडलेली आगीची घटना अतिशय संशयास्पद आहे.

आमच्या मनात दाट शंका आहे की सध्याचे जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर आणि इतर विषयांपासून लोकांची मने वळवण्यासाठी सरकार कडून हे हेतुपुरस्सर केले गेले आहे, असा आरोप विकास भगत यांनी पत्रकार परिषदेत केलाय.

मडगांव येथे सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा ग्रुपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्यात लागणाऱ्या आगी आणि वणव्यांबद्दल सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय.

जेव्हा गोव्याच्या हिताविरोधी काहीतरी घडते आणि त्यासाठी जर गोमंतक जनता आवाज उठवणार असे चित्र दिसू लागले की भाजप सरकार लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असे काहीतरी प्रकार करते.

सध्या गोव्यात ज्या आगी लागताहेत त्यामागे भाजप सरकारचाच हात असून लोकांचे म्हादई प्रश्नी लक्ष विचलित करण्यासाठी असे प्रकार घडवून आणले जात आहेत असा आरोप जयेश शेटगांवकर यांनी या पत्रकार परिषदेत केला.

Press
Vishwajit Rane: आगींच्या घटनांबाबत रिस्क घेणार नाही, वनमंत्र्यांनी सांगितला सरकारचा प्लॅन...

"सरकारला म्हादई कर्नाटकला द्यायची आहेत. त्या दृष्टीनेच सरकार पाऊल उचलत आहे. सध्या ज्या आगी लागत आहेत त्या भीषण आहेत. राज्यातील जंगलांसोबतच वन्यजीवांचे जीवन आगींमुळे संकटात आले आहे. आग रोखण्यासाठी सरकार कडून कोणतीही ठोस अशी पाऊलं उचलली जात नाहीत.

Press
Usgaon Parent Protest: "आमका नाका मोबाईल टॉवर" - पालकांनी दिलाय 'हा' इशारा

म्हादई प्रश्नावरून लोकांचे लक्ष विचलित व्हावे यासाठीच सरकार कडून हा प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना हा प्रश्न सोडवता येत नसेल तर त्यांनी खुर्चीवरून पायउतार व्हावं, अन्यथा लोकभावनेचा भडका उडाल्यास सरकारला आवरणे कठीण जाईल", असा इशारा शेटगांवकर यांनी पत्रकार परिषदेत दिला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com