Goa Cancer Patient Farewell Dainik Gomantak
गोवा

मृत्यू समोर होता, त्याने जंगी पार्टी दिली; गोव्यातील कॅन्सरग्रस्त तरुणाची ‘अखेरची इच्छा’ पूर्ण

अखेरचा दिस गोड करण्यासाठी मित्रांसह रूग्णालय प्रशासनाचीही धडपड

Akshay Nirmale

Goa Cancer Patient Farewell: दक्षिण गोव्यातील लोटली येथील कॅन्सरच्या अ‍ॅडव्हान्स स्टेजमधील रूग्णांसाठी असलेल्या शांती अवेदना सदन रूग्णालयातील एका अनोख्या निरोप समारंभाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. 28 वर्षीय अ‍ॅशली नरोन्हा या कॅन्सरग्रस्त युवकाला या रूग्णालयात त्याची अखेरची इच्छा पुर्ण करत अनोखा निरोप देण्यात आला.

पार्टी करत अ‍ॅशली मृत्यूला हसत सामोरा गेला. फुगे, कराओके म्युझिक, चिप्स आणि केक असा सगळा पार्टीचा माहौल यावेळी होता. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ही घटना घडली.

अ‍ॅशलीला क्रॉनिक मायलॉईड ल्युकेमिया कॅन्सर झाला होता आणि तो अंतिम टप्प्यात होता. पण अ‍ॅशलीला आयुष्य एंजॉय करायचे होते आणि हीच त्याची शेवटची इच्छा होती. त्याच्याकडे वेळ कमी असल्यामुळे त्याला जंगी पार्टीने निरोप द्यायची कल्पना समोर आली आणि त्या कल्पनेला मुर्त रूप देण्यात आले.

अ‍ॅशलीने सर्वांना बजावले होते की, मला कुणाचेही दुःखी चेहरे पाहायचे नाहीत. कुणाचेही उदास चेहरे नकोत. प्रत्येकानेच आयुष्य सेलिब्रेट केले पाहिजे, असे अॅशली म्हणाला होता.

त्याला कॅन्सरवर उपचारात मदत करणाऱ्या सॅबरकेअर ट्रस्टचे संस्थापक लॉर्डेस सोरेस म्हणाले की, "अ‍ॅशलीने केलेली विनंती आमच्यासाठी अनोखी होती. हातात वेळ कमी होता. शांती अवेदना सदनमधील टीमनेच अ‍ॅशलीच्या डॉक्टरांच्या परवानगीने एका पार्टीचे आयोजन केले.

अ‍ॅशलीला ऑक्सिजन सपोर्टसाठी नाकात नळी जोडली होती. पण त्याला या पार्टीत चांगले दिसायचे होते. म्हणून मग त्याची दाढी करण्यात आली. मेकअपही केला गेला, असे या पार्टीसाठी मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सागरिका प्रभू गावकर यांनी सांगितले. अशारितीने पूर्ण तयार झाल्यावर अ‍ॅशलीला व्हीलचेअरवरून बाहेर आणले गेले आणि या पार्टीला सुरवात झाली.

फुगे, कराओके म्युझिक, चिप्स, कोक, केक असा एरवीच्या पार्टीत दिसणारा सर्व तामझाम या पार्टीत केला गेला. अ‍ॅशलीचे कुटूंबीय उपस्थित होते. पार्टीला उपस्थित असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसु आणि डोळ्यात अश्रू होते.

मृत्यूचा सामना करत असतानाही अ‍ॅशली त्या संध्याकाळी सर्वांशी मनापासून बोलला. कुटूंबीय, मित्रांना हसवण्यासाठी त्याने जोकही केले. विनोदबुद्धी वापरत सर्वांना उत्साही ठेवले. कॅन्सरने मरण्यापुर्वीच सॅड साँग मला मारून टाकतील, असे सांगत त्याने पॉप संगीत लावण्याची विनंती केली.

सोरेस म्हणाले की, अ‍ॅशलीने त्याचे आवडते ड्रिंक रम आणि कोक देखील मागितले. पण डॉक्टरांनी त्याला रम दिली नाही. काही वेळानंतर त्याला आराम वाटावा म्हणून पाहुण्यांना जाण्यास सांगण्यात आले.

शांती अवेदना सदनातील सर्वांसाठीच ही फेअरवेल पार्टी अनोखी होती. पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी अ‍ॅशलीने अखेरचा श्वास घेतला. मृत्यूनंतर त्याला कुटुंबीयांनी आणलेले कपडे घातले गेले. त्यानंतर तो जणू एखाद्या देवदुतासारखाच भासत होता, अशी भावना तेथील नर्सनी व्यक्त केली.

अ‍ॅशली हा मूळचा कुचेलीचा रहिवाशी होता. हणजुणे येथील एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होता. डॉ. अनुपमा बोरकर यांच्या नेतृत्वाखालील गोवा मेडिकल कॉलेजच्या ऑन्कोलॉजी पथकानेही त्याच्यावर उपचार केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT