Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर पिस्तुलसह नैनितालच्या 22 वर्षीय युवतीला अटक

विमानतळावर खळबळ, जीवंत काडतुसेही केली जप्त
Published on

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका युवतीकडे 32 कॅलिबर राऊंड पिस्तूलाचे जीवंत काडतूस आढळून आले. याप्रकरणी सीआयएसएफ विभागाने तिला अटक केली.

हर्षिता जोशी (वय 22) असे संशयित युवतीचे नाव असून ती मुळ उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथील रहिवासी आहे.

Dabolim Airport
Foreign Tourists : विदेशी पर्यटकांच्या विरोधातील गुन्हे रोखा! पर्यटन व्यावसायिकांची मागणी

हर्षिता ही शुक्रवारी (ता. 10) रात्री 11.30 च्या सुमारास दिल्लीला जाण्यासाठी दाबोळी विमानतळावर आली होती. यावेळी तपासणीदरम्यान तिच्या हँडबॅगमध्ये 32 एमएम कॅलिबर राऊंडच्या पिस्तूलाचे जिवंत काडतूस आढळले.

या प्रकारानंतर विमानतळावर खळबळ उडाली होती. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी अंकुर यादव यांनी संबंधित युवतीला ताब्यात घेत दाबोळी विमानतळ पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली.

या युवतीकडील पिस्तुल ऑटोमॅटिक कोल्ट पिस्तूल आहे. ही महिला तिच्या मूळ गावी जाण्यासाठी विमानतळावर आली होती तेव्हा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) कर्मचार्‍यांनी तिची हँडबॅग स्कॅन केली असता त्यात पिस्तुल असल्याचे दिसून आले. तिच्याकडे चौकशी करत तिला ताब्यात घेतले गेले.

Dabolim Airport
Save Mahadayi : राज्यभरात दीप जागोर; ‘सेव्ह म्हादई’ चळवळीच्या आवाहनाला प्रतिसाद

या महिलेने चौकशी केली असता पिस्तूल आणि जिवंत काडतुसे कशी व कोणी ठेवली याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.

तिला ताबडतोब दाबोळी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, त्यांनी तिला अटक करून नंतर जामिनावर सोडले. दाबोळी विमानतळ पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. तिला सात दिवस पोलिस स्थानकावर हजेरी लावण्याची अट घालून जामिनावर सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com