St. Xavier Exposition Dainik Gomantak
गोवा

St. Xavier Exposition: युकेरिस्टिक सेलिब्रेशनने होणार शवप्रदर्शनाची सुरुवात; मात्र हा सोहळा नेमका आहे तरी काय?

Eucharistic Celebration Old Goa: या सोहळ्याची सुरुवात २१ नोव्हेंबर रोजी युकेरिस्टिक उत्सवाने होणार आहे.

Akshata Chhatre

What is Eucharistic Celebration

जुने गोवे: यंदाचा नोव्हेंबर महिना गोव्यासाठी खास असणार आहे. कारण येत्या २१ नोव्हेंबर पासून जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा शवप्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. हा शव प्रदर्शन सोहळा एकूण ४६ दिवस चालेल आणि या उत्सवाला देश-विदेशातून अनेक भाविक गोव्यात येण्याची शक्यता वर्तवली जातेय.

या सोहळ्याची सुरुवात २१ नोव्हेंबर रोजी युकेरिस्टिक उत्सवाने होणार आहे, यानंतर रोज सकाळी ७ ते संध्याकाळी ६ यावेळी अवशेषांची दैनंदिन पूजा केली जाईल आणि दररोज आठ मास होतील.

३ डिसेंबर हा दिवस गोव्यात फारच प्रसिद्ध आहे कारण या दिवशी दरवषी जुन्या गोव्यात गोव्याच्या सायबाचे फेस्त आयोजित केले जाते आणि म्हणून शवप्रदर्शनाच्या या काळात फेस्तादिवशी एक विशेष मास आयोजित करण्यात येणार आहे आणि ५ जानेवारी रोजी याची सांगता होईल.

सोहळ्याला येणारे यात्रेकरू आर्कडायोसेसन वेबसाइटद्वारे जुन्या गोव्यात निवास बुक करू शकतात तसेच विशेष मास स्लॉटचा वापर देखील करू शकतात. गोव्याच्या सायबाच्या या महत्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ओळख प्रमाणपत्र असणे मात्र आवश्यक आहे.

युकेरिस्टिक सेलिब्रेशन म्हणजे काय?

युकेरिस्टिक सेलिब्रेशन, ज्याला मास किंवा होली कम्युनियन म्हणून देखील ओळखले जाते. हा ख्रिश्चन समाजाचा एक आध्यत्मिक सोहळा आहे जिथे भाविक पूजा कारण्यासाठी किंवा माससाठी एकत्र येतात. देवाप्रति कृतज्ञता व्यक्त करणे तसेच येशूच्या बलिदानाचे स्मरण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असतो आणि यामुळे सामाजिक बंध आणखीन मजबूत होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT