Saint Francis Xavier Exposition: संत फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शनाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या 46 दिवसांचे दैनंदिन कार्यक्रम

Saint Francis Xavier Exposition Time Table: संत फ्रान्सिस झेवियर यांचा शवप्रदर्शन सोहळा २१ नोव्हेंबर २०२४ ते ०५ जानेवारी २०२५ दरम्यान ओल्ड गोव्यात आयोजित करण्यात आला आहे.
Saint Francis Xavier Exposition: संत फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शनाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या 46 दिवसांचे दैनंदिन कार्यक्रम
Saint Francis Xavier ExpositionDainik Gomantak
Published on
Updated on

Saint Francis Xavier Exposition Schedule

जुने गोवे: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शनाचा सोहळा येत्या २१ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ओल्ड गोव्यात ४६ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी सरकार जय्यत तयारी करत आहे. गोंयचा सायब अशी ओळख असणाऱ्या झेवियर यांच्या या दशवार्षिक सोहळ्यासाठी देश विदेशातील पर्यटक भेट देतील. या सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

संत फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन (वेळापत्रक)

२१ नोव्हेंबर २०२४ (गुरुवार) ते ०५ जानेवारी २०२५ (रविवार)

दररोज पार पडणारे मास (Daily Masses)

कोकणी मास- सकाळी ६ वा., ७.१५ वा., ८.३० वा., ९.४५ वा., ११ वा., ३.३० वा., ५.०० वा.,

इंग्रजी मास - सायंकाळी ६.१५ वाजता

फेस्त दिवशीचे मास (Feast Mass)

कोकणी - पहाटे ३.४५ वा, ५.०० वा, ६.०० वा, ७.१५ वा. ८.३० वा,

हाय मास - सकाळी १०.३० वा (इंग्रजी)

इंग्रजी मास - दुपारी १२.वा, ३.३० वा, ५.०० वा, ६.१५ वा.

विशेष मास (Special Mass) - नोव्हेंबर २१, २४, ३५, २८, ३० डिसेंबर ०१, ०२, ०३, ०४, २४, २९, ३०, ३१ आणि ०५ जानेवारी

Scan QR Code For Saint Francis Exposition Detailed Schedule
Scan QR Code For Saint Francis Exposition Detailed ScheduleDainik Gomantak

विविध भाषेतील मास

२४ नोव्हेंबर सकाळी अकरा वाजता तमिळ भाषेतील मास, दुपारी सव्वा बारा वाजता मल्याळम भाषेत तर दुपारी दोन वाजता हिंदी भाषेत मास होईल.

२६ नोव्हेंबर रोजी फ्रेंच भाषेत मास होईल.

०१ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पोर्तुगीज भाषेतील मास पार पडेल.

०२ डिसेंबर रोजी कन्नड भाषेतील सकाळी अकरा वाजता पार पडेल.

कन्फेशन (Confessions)

कन्फेशनसाठी पहाटे साडे पाच ते दुपारी बारा आणि सायंकाळी ३ ते ७ पर्यंत वेळ ठेवण्यात आला आहे.

Saint Francis Xavier Exposition: संत फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शनाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या 46 दिवसांचे दैनंदिन कार्यक्रम
Cyber Scam: लग्ना खातीर डेटींग फटींगपणां! गोवा पोलिसांकडून सायबर स्कॅम अलर्ट, केले महत्वाचे आवाहन

संत फ्रान्सिस झेवियर एक्सपोशिनच्या संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.

शवप्रदर्शनाच्या ठिकाणी कसे पोहोचाल? (How To Reach Old Goa Church)

संत फ्रान्सिस झेवियर शव प्रदर्शन सोहळा ओल्ड गोव्यातील बॅसिलिका बॉम जिझस चर्चमध्ये पार पडणार आहे. याला ओल्ड गोवा चर्च असे देखील म्हटले जाते. येथे पोहोचण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करता येईल.

१) पणजी बस स्थानकावरुन रायबंदर मार्गे ओल्ड गोवा चर्च येथे पोहोचता येईल. किंवा मेरशी सर्कलवरुन महामार्गाने देखील ओल्ड गोव्यात जाता येईल. यासाठी कदंब तसेच खासगी बसचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच, गोवा माईल्सची किंवा खासगी टॅक्सी बुक करता येईल.

२) मोपा किंवा दाबोळी विमानतळावर उतरल्यास, मोपावरुन पणजीत यावे लागेल आणि तिथून ओल्ड गोवा शव प्रदर्शन ठिकाणी जाता येईल. तसेच, दाबोळी विमानतळावर उतरल्यास तिथून पणजी आणि नंतर ओल्ड गोव्यात जावे लागेल.

३) रेल्वेने आल्यास वास्को द गामा, मडगाव रेल्वे स्थानकावर उतरल्यास देखील पणजीमार्गे ओल्ड गोव्याला जाता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com