जिल्हाधिकारी रुचिका कटीयाल याना निवेदन सादर करताना  इनासियो व्हाज Dainik Gomantak
गोवा

Goa: CZMP सुनावणी एकाच दिवसात संपविल्याबद्दल नागरीकांमध्ये नाराजी

दक्षिण गोव्याच्या (South Goa) जिल्हाधिकारी रुचिका कटियाल (Ruchika Katyal) यांनी नागरीकांना आपल्या सुचना लेखी पद्धतीने 15 जुलै 2021 पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीत (Collector office) देण्यास परवानगी दिली आहे

दैनिक गोमन्तक

फातोर्डा - दक्षिण गोव्याच्या (South Goa) जिल्हाधिकारी रुचिका कटियाल (Ruchika Katyal) यांनी नागरीकांना आपल्या सुचना लेखी पद्धतीने 15 जुलै 2021 पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीत (Collector office) देण्यास परवानगी दिली आहे. मात्र सुनावणीस नोंदणी केलेल्या व पहिल्या दिवशी ज्यांना आपले म्हणणे मांडता आले नाही व जे उशीरा घरी गेले त्यांनाच या सुचना लेखी पद्धतीने देता येतील. तत्पुर्वी काल पहिल्याच दिवशी उशीरा जनसुनावणी (Public hearing) बंद करण्यात आली तेव्हा अनेक नागरीक उशीर होतो म्हणुन, किंवा घरी जायला वाहतुकीची व्यवस्था नसेल या भितीनेच सहा वाजल्या नंतर आपआपल्या घरी जाण्यास निघाले होते. हे नागरीक आज सकाळी 10 वाजता एसजीपीडीए मैदानावर आले. मात्र जनसुनावणी कालच संपली हे कळताच त्या सर्वांनी नाराजी व्यक्त केली व नंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला.(The district collector has given a deadline of July 15 to give instructions to the citizens)

किनारपट्टी विभागीय व्यवस्थापन योजना (सीझेडएमपी) जनसुनावणीस आपली मते मांडण्यासाठी 700 पेक्षा जास्त नागरीकांनी नोंदणी केली होती.इंजिनियर अभिजीत प्रभुदेसाई (Abhijit Prabhudesai) यांनी सांगितले की जनसुनावणी कसलीही पुर्व सुचना न देता आटोपती घेणे हे घटनेच्या विरुद्ध आहे. संपुर्ण जनसुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले. जर आमचे म्हणणे ऐकुन घेतले नाही तर घटना व कायद्यात अनेक पर्याय आहेत, जेणेकरुन आमचे म्हणणे संबंधीतांना ऐकुन घ्यावेच लागेल असेही प्रभुदेसाई म्हणाले.

फ्रॅंकी द लोटली व शिरोडा येथील रुजार क्रुझ यांनी सांगितले की आम्ही आमची घरची कामे, शेतीची कामे अर्धवट सोडून काल आले होते. जर सीआरझेड योजनेप्रमाणे आराखडा तयार केला असेल तर तो कुठे आहे व तो आम्हाला कां दाखवला जात नाही असे प्रश्र्न उपस्थित केले. बेताळभाटीचे सरपंच कोस्तांव मिरांडा यांनी सांगितले की आपल्या कक्षेत जवळ जवळ 6 किमी किनापट्टीच्या भागाचा समावेश होतो. सर्व पारंपारीक रांपणकारांना आराखडा तयार करताना विश्र्वासात घेणे गरजेचे आहे.

झरीना डिकुन्हा हिने सांगितले की आमची पहिल्या दिवशी दैनाच झाली. जेवण-खाणाची व्यवस्था नव्हती. येथे येणाच्या सर्व वाटाच बंद करण्यात आल्या होत्या. जनसुनावणी ही लोकशाही व पारदर्शक  पद्धतीने, होणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT