Alcohol Dainik Gomantak
गोवा

Goa Police: पोलिसांची नशा उतरवणार! नव्या DGP च्या आदेशाने धाबे दणाणले

Manish Jadhav

पोलीस स्थानकात दारुचे सेवन करणाऱ्या तसेच जुगार खेळणाऱ्या पोलीसांवर कारवाई करण्याचे निर्देश गोव्याच्या डीजीपींनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

एवढचं नाहीतर अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी तयार करुन ती पोलीस अधीक्षकांना देण्याचे निर्देशही पोलीस निरिक्षकांना देण्यात आले आहेत. पोलीस मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन अल्बूकर्क यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

दरम्यान, पोलीस खात्यातील अनेक पोलीस कर्मचारी दारु, ड्रग्ज आणि जुगाराच्या आहारी गेलेत. ड्यूटीवर असतानाही ते दारु, ड्रग्जचे सेवन करतात. त्याचाच परिणाम त्यांच्या शरीर आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. त्यामुळे अशाप्रकारचा आदेश काढण्याची वेळ पोलीस मुख्यालयावर आली आहे.

महासंचालक अलोक कुमार यांनी शनिवारी (दि.२०) सकाळी एक आदेश जारी केला. आदेशात जिल्हा पोलिस अधीक्षकांना हद्दीतील पोलिस स्थानकांना सप्राईस भेट देण्याचे आदेश दिले आहेत. ऑन ड्यूटी पोलिस कर्मचाऱ्याने नशा (मद्य अथवा अमली पदार्थ सेवन) केल्याचे आढळून आल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

पोलिस स्थानकांच्या निरीक्षकांना अशा नशेखोर पोलिस कर्मचाऱ्यांची यादी तयार करून ती पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्याची सूचना केली आहे.

आसगाव प्रकरणामुळे वादात सापडलेले गोव्याचे माजी पोलिस महासंचालक जसपास यांची नाट्यमय घडामोडीनंतर अखेर दिल्लीत बदली झाली. त्यांच्या जागी अलोक कुमार यांची गोव्याच्या महासंचालकपदी वर्णी लागली.

पदभार स्वीकारताच अलोक कुमार अ‍ॅक्शनमोडमध्ये आले आहेत. गेल्या काही महिन्यातील घटनांमुळे बदनाम झालेल्या पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी कुमार यांनी कंबर कसल्याचे दिसून येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT