Goa development on Ashok Tanwar  Dainik gomantak
गोवा

'गोव्यात होत असलेला विकास म्हणजे करोडोंचा घोटाळा'

विधानसभा निवडणुकीत गोव्यातील जनता भाजपला राज्यातून हद्दपार करेल

दैनिक गोमन्तक

देशातील शेतकरी शहीद सैनिकांचा अपमान करणाऱ्यांना येथील जनता कदापी माफ करणार नसल्याची माहिती तृणमूल काँग्रेसचे नेते तथा हरियाणाचे माजी खासदार अशोक तन्वर यांनी दिली. गोवा विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेस व मगो पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे हात बळकट बनवणार असल्याची माहिती तन्वर यांनी दिली.

वास्कोचे गोवा तृणमूल काँग्रेसचे उमेदवार सैफुल्ला खान यांचा घरोघरी प्रचार करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे नेते तथा हरियाणाचे माजी खासदार अशोक तन्वर यांनी हजेरी लावली. वास्को मांगोरहिल, बायणा अशा विविध ठिकाणी माजी खासदार तन्वर यांनी पक्षाची नीती यावेळी व गोव्याचा विकास कशा पद्धतीने करणार याची माहिती सर्वांना दिली.

यावेळी बोलताना अशोक तन्वर म्हणाले की ज्याने देशाला शेतकऱ्यांबरोबर शहीद सैनिकांचा अपमान केला अशा व्यक्तींना देश कदापि माफ करणार नाही.

गोव्यात होत असलेला विकास म्हणजे करोडो रुपयांचा घोटाळा आहे. भाजपने (BJP) जनतेचा विकास न करता स्वतःचा विकास मात्र अवश्य केला असल्याची प्रतिक्रिया अशोक तन्वर यांनी दिली.

वास्को तृणमूल काँग्रेसचे (TMC) उमेदवार सैफुल्ला खान यांनी सांगितले की वास्को विकासापासून राज्य सरकारने मुद्दाम हून मागे ठेवला आहे. वास्को मतदारसंघ मोठ्या विकासापासून वंचित राहिल्याने जनता भाजप सरकारवर नाराज झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील जनता भाजपला राज्यातून हद्दपार करतील अशी माहिती खान यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT