Mapusa Crime News  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime News: खोर्लीतील ओढ्यात आढळलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली

Mapusa Crime News: खोर्ली-म्हापसा येथील वेर्ला-काणका बगलमार्गाच्‍या बाजूला ओढ्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली.

दैनिक गोमन्तक

Mapusa Crime News: खोर्ली-म्हापसा येथील वेर्ला-काणका बगलमार्गाच्‍या बाजूला ओढ्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली. राकेश कुमार (30 , रा. गंगानगर-खोर्ली, मूळ : उत्तर प्रदेश) असे त्‍याचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार, काल रविवारी (ता. १) सायंकाळी राकेश कुमार याचा मृतदेह खोर्ली येथील ओढ्यात आढळला होता.

आज सोमवारी म्हापसा पोलिस स्थानकात त्याचा नातेवाईक हा राकेश कुमार बेपत्ता असल्याची तक्रार देण्यास आला होता.

त्यानंतर वरील मृतदेह हा राकेश कुमारचा असल्याचे स्‍पष्‍ट झाले. उद्या, मंगळवारी (दि.३) गोमेकॉत मृतदेहावर उत्तरीय तपासणी होणार आहे. त्यानंतरच, राकेशच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. राकेश हा अविवाहित होता.

दरम्‍यान, ओढ्यातील प्रवाहित पाण्यातून जवळपास दीड ते दोन किलोमीटर मृतदेह वाहत खाली आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्‍ात येत आहे. अधिक तपास सुरू आहे.

भरपावसात गेला होता चालत

मागील दहा वर्षांपासून राकेश हा गोव्यात वास्तव्यास होता. तो मोलमजुरीचे काम करायचा. आपल्या नातेवाईकांसोबत तो खोर्ली येथे भाड्याने राहत असे.

शनिवारी त्याला काहींनी भरपावसात ओढ्याच्या बाजूने माळरानावर चालत जाताना पाहिले होते. तसेच काही वर्षांपूर्वी त्याचा गंभीर अपघात झाला होता. त्यामुळे त्याच्या डोक्यावर जखमेची खूण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT