Court Dainik Gomantak
गोवा

Danielle McLaughlin Murder Case: सात साल बाद! ब्रिटिश महिलेचे लचके तोडणाऱ्या नराधमाभोवती कायद्याचा फास आवळणार

Goa Crime News: ब्रिटिश बॅकपॅकर डॅनियली मॅकलॉग्‍लीन हिच्‍या खूनप्रकरणातील खटला १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करणे आवश्‍‍यक आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: ब्रिटिश बॅकपॅकर डॅनियली मॅकलॉग्‍लीन हिच्‍या खूनप्रकरणातील खटला १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करणे आवश्‍‍यक आहे. त्‍यामुळे पुढील सर्व सुनावण्‍यांसाठी या प्रकरणातील संशयित विकट भगत याला प्रत्‍यक्ष न्‍यायालयात हजर करा, असे निर्देश दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश क्षमा जोशी यांनी कोलवाळ तुरुंगाच्‍या अधीक्षकांना दिले आहेत. काल मंगळवारी ५ नोव्‍हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी न्‍यायालयात ठेवण्‍यात आली होती. परंतु विकट भगत याला कोलवाळ कारागृहातून न्‍यायालयात हजर करू न शकल्‍याने ही सुनावणी गुरुवारी ७ नोव्‍हेंबरपर्यंत तहकूब करण्‍यात आली आहे.

डॅनियली मॅकलॉग्‍लीन ही गोव्‍यात आली असता मार्च २०१७ मध्‍ये राजबाग-काणकोण येथे तिचा खून झाला होता. या प्रकरणात काणकोण पोलिसांनी संशयित म्‍हणून विकट भगत याला अटक केली होती. खून करण्‍यापूर्वी तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार करण्‍यात आल्‍याचे शवचिकित्‍सा अहवालातून स्‍पष्‍ट झाले होते. त्‍यामुळे गोव्‍यासह देशभर आणि जगभर खळबळ माजली होती.

या प्रकरणाची सुनावणी सध्‍या मडगावच्‍या सत्र न्‍यायालयात सुरू आहे. मंगळवारी ३१३ कलमाखाली संशयित विकट भगत याला त्‍याच्‍यावरील आरोप समजावून देण्‍याची प्रक्रिया सुरू केली जाणार होती. परंतु त्‍याला न्‍यायालयात हजर करण्‍यासाठी पुरेसे पोलिस कर्मचारी नव्‍हते, असे कोलवाळ कारागृहाच्‍या जेलरने न्‍यायालयाला पत्र पाठवून कळविले. त्‍यामुळे ही सुनावणी आता गुरुवारपर्यंत तहकूब करण्‍यात आली आहे. यापुढील प्रत्‍येक सुनावणीसाठी संशयिताला न्‍यायालयात हजर करावे, अशी सूचना न्‍या. जोशी यांनी यावेळी केली. दरम्‍यान, जगभर गाजलेल्‍या या प्रकरणाच्‍या खटल्‍याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दोषीला कडक शिक्षा व्‍हावी, अशीच सर्वांची इच्‍छा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT