Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ओडिशातून गोव्‍यात गांजा तस्‍करी करणाऱ्या संशयितास जामीन मंजूर! गोव्‍याबाहेर जाण्यास मनाई

Goa Court: गोव्‍याच्‍या प्रधान सत्र न्‍यायाधीश शरीन पॉल यांनी त्‍याला ५० हजाराच्‍या जामीनावर मुक्‍त केले. संशयिताच्‍यावतीने ॲड. एल. मोन्‍तेरो यांनी बाजू मांडली.

गोमन्तक डिजिटल टीम

ओडिशातून गोव्‍यात होत असलेल्‍या गांजा तस्‍करीतील संशयित म्‍हणून कुडचडे पोलिसांनी अटक केलेल्‍या पालियाभिंदा, भद्रक (ओडिशा) येथील संशयित अक्षयकुमार बिस्‍वाल (३८) याच्‍या विरोधात पोलिस कुठलाही भक्‍कम पुरावा न्‍यायालयासमोर सादर करू न शकल्‍याने दक्षिण गोव्‍याच्‍या प्रधान सत्र न्‍यायाधीश शरीन पॉल यांनी त्‍याला ५० हजाराच्‍या जामीनावर मुक्‍त केले. संशयिताच्‍यावतीने ॲड. एल. मोन्‍तेरो यांनी बाजू मांडली.

कुडचडे पोलिसांनी ६ नोव्‍हेंबर रोजी पहाटे पावणेचारच्‍या सुमारास कुडचडे रेल्‍वे स्‍थानक परिसरात अक्षयकुमार याला संशयितरीत्या फिरताना अटक केली होती. त्‍याच्‍याकडे दोन पिशव्‍या सापडल्‍या होत्‍या. त्‍यात ८.४७ किलो गांजा होता. याची आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत ८.४७ लाख रुपये किंमत होती. ओडिशातील एका माणसाने हा गांजा गोव्‍यात पोचविण्‍याचे काम आपल्‍यावर सोपविले होते आणि त्‍यासाठी आपल्‍याला ७ हजार रुपये दिले होते अशी जबानी त्‍याने पोलिसांना दिली होती. यापूर्वीही अक्षयकुमारने गोव्‍यात गांजाची तस्‍करी केली असावी असा त्‍याच्‍यावर संशय होता. मात्र ठोस पुरावे पोलिस सादर करू शकले नव्‍हते.

संशयिताकडे सापडलेला अमलीपदार्थ हा कमी वजनाचा असल्‍याने त्‍याच्‍या विरोधात भारतीय न्‍याय संहितेच्‍या ३७ कलमाखाली गुन्‍हा नोंद होऊ शकत नाही. तसेच या संशयित यापूर्वी अन्‍य कुठल्‍याही गुन्‍ह्यात सामील असल्‍याचे पुढे आलेल नाही. त्‍यामुळे या संशयिताला ५० हजार रुपयांच्‍या जामीनावर व आणखी एका हमीवर सोडण्‍यात यावे असे नमूद करून न्‍यायालयाच्‍या परवानगीशिवाय संशयिताने गोव्‍याबाहेर जाऊ नये आणि त्‍याच्‍याकडे पासपोर्ट असल्‍यास तो न्‍यायालयात जमा करावा, अशी अट घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT