C-20 Conference ‘जी-20’ राष्ट्रांचे अध्यक्षपद भारताला लाभणे ही ऐतिहासिक गोष्ट आहे. भारताने विश्वाला योग, आयुर्वेद आदी दिलेली देणगी आहे. भारताला संगीत, नृत्य, कला, साहित्य, चित्र, शिल्प आदींचा मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे.
याचे सर्वांसोबत आदानप्रदान होणे आवश्यक आहे. भारत हा आता केवळ विकसनशील देश नव्हे, तर विकसित आणि महासत्ता म्हणून विश्वात उदयास येत आहे.
देशाच्या या नवनिर्माणामध्ये आणि देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रत्येक भारतीयाचा सहभाग आवश्यक आहे, असे आवाहन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
ते ‘गोवा शासन’, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ आणि ‘भारतीय विद्या भवन, नवी दिल्ली’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘सी-२० परिषदे’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
दाबोळी-वास्को येथील ‘राजहंस नौदल सभागृह’ येथे आयोजित ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ याविषयावरील ‘सी-20 परिषदे’ला देश-विदेशांतून आलेले मान्यवर आणि 350 हून अधिक तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित होते.
‘सी-20’च्या व्हिडिओचे लोकार्पण
या वेळी ‘सी-20 परिषदे’च्या प्रा. डॉ. शशिबाला यांनी ‘सी-20 परिषदेचे’चे मानचिन्ह असलेले दोन ध्वज ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या श्वेता क्लार्क आणि शॉन क्लार्क यांना सुपुर्द केले.
या वेळी कला-सांस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते ‘सी-20’ परिषदेचा ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा संदेश देणाऱ्या संगीतमय व्हिडिओचे लोकार्पण करण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.