Goa Police |Goa News
Goa Police |Goa NewsDainik Gomantak

Goa Crime: झुआरीनगर गोळीबारातील संशयितांना पोलिस कोठडी

उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने दोघा संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
Published on

Goa Crime सांकवाळ-झुआरीनगर एमईएस कॉलेजजवळील एका बंगल्यात चोरीसाठी आलेल्या व नंतर पोलिसांवर गोळीबार करून पसार झालेल्या चोरट्यांना रिमांडवर घेण्यात आले आहे.

अनस अन्सारी (22) या संशयिताला सात तर साजिद अन्सारी (36) या संशयिताला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

सांकवाळ येथील डॉ. आमोणकर यांच्या बंगल्याचा चोरटे दरवाजा फोडत असताना शेजाऱ्याने ते पाहिले व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी येताना दिसताच चोरटे दुचाकीवरून पळाले.

Goa Police |Goa News
Goa College Admission: ऑनलाईन प्रवेशाची पहिली फेरी उद्यापासून सुरू

यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर दुचाकीवर बसलेल्या तिघांपैकी एका चोरट्याने दोन गोळ्या झाडल्या. त्यात एक गोळी पोलिस होमगार्डच्या गुडघ्याला घासून गेली.

तर दुसरी गोळी पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक यांच्या डोक्यावरून गेल्याने ते बचावले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सर्वत्र नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध सुरू केला.

पोलिसांना तिघापैकी एकजण दिल्ली जवळच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक सलीम शेख, फातोर्डा पोलिस निरीक्षक नाईक यांच्यासह 8 पोलिस कॉन्स्टेबल यांचा समावेश असलेले एक पथक दिल्लीत गेले.

त्यानंतर तेथील पोलिसांच्या मदतीने दोघा संशयिताच्या मुसक्या आवळल्या. तर मेरठ-उत्तर प्रदेश येथून इतर दोघा संशयिताच्या मुसक्या आवळल्या व त्यांना गोव्यात आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com