Speaking at the press conference, Goa Forward Executive President Kiran Kandolkar. Vice President Durgadas Kamat and Sameer Gadekar Sandeep Desai
गोवा

Goa: राजदीपच्या गाडीवरील हल्‍ला हे षडयंत्र

Goa: सूत्रधारांना गजाआड करण्याची गोवा फॉरवर्डची मागणी

Sanjay Ghugretkar

पणजी: कलेच्या माध्यमातून कलाकारांची समस्या मांडणारे नामवंत कलाकार राजदीप नाईक (Rajdeep Naik) यांच्या गाडीच्या झालेल्या तोडफोडीच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणामागे षडयंत्र असून मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना गजाआड करण्याची मागणी गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांनी पणजीतील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली.

सरकारने कलाकारांसाठी आर्थिक सहाय्यता योजनेद्वारे दहा हजार रुपये मानधन घोषित केल्यानंतर नाईक यांनी कलाकारांना ही भीक नको तर त्यांना मानसन्मान द्यावा असे वक्तव्य आपल्या यूट्यूबवरून केले होते. त्याचा सूड या घटनेने उगवण्यात आला आहे. या प्रकरणामागे जो कोणी आहे त्याचा शोध पोलिसांनी निःपक्षपातीपणे तपास करून घेऊन अटक करावी.

या घटनेतून कोणी आवाज केला तर अशा प्रकरांना सामोरे जावे लागले अशी कलाकारांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हा अन्याय असल्याने त्यामागे षडयंत्र असल्याचा दावा कांदोळकर यांनी केला. या प्रकरणाचा तपास करण्यामध्ये हस्तक्षेप झाल्यास किंवा सूत्रधारांना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्यास आंदोलन केले जाईल, असे मत कांदोळकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नावर व्यक्त केले.

कलाकार राजदीप नाईक (Rajdeep Naik) यांना पूर्ण गोवा ओळखतो. कोविड काळात कलाकारांची दखल घेतली नाही. त्यामुळे ‘यूट्यूब’च्या माध्यमातून ते नेहमीच कलाकारांच्या समस्या समाजापर्यंत पोचवत असत. अनेकदा ते सरकारवर टीकाही करायचे ते पचत नव्हते, त्यामुळे हा भ्याड हल्ला त्यांच्या गाडीवर करण्यात आला असून त्यामागे मंत्र्यांचा हात असल्याचा संशय आहे असा आरोप एक कलाकार समीर गडेकर यांनी केला.

गेल्या कोविड काळात अनेक कलाकारांचा रोजगार गेला व कला अकादमी येथील रंगमेळ ही संस्थाही बंद झाली. या संस्थामध्ये काही कलाकारांना रोजगार मिळत होता तो सुद्धा बंद झाला आहे. कला अकादमीचे नुतनीकरण करण्यात येत आहे हे कोणासाठी हे सर्वश्रुत आहे. या घटनेसंदर्भात अनेक कलाकारांना त्यावर आपली प्रतिक्रिया द्यायची आहे मात्र अशा घटना त्यांच्या बाबतीतही होऊ शकतात त्यामुळे ते पुढे येत नाहीत. या कृत्याचा निषेध करून पोलिसांनी या हल्‍ल्यामागील सूत्रधारांना अटक करून कलाकांरांवर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी गडेकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT