Goa : मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांची भेट

गावडा, कुणबी, वेळीप समाजासह धनगर समाजाला अनुसुचित जमातींत दर्जा (status) मिळावा यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या नेतत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्र्यांची भेट घेतली.
Goa : मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांची भेट
Dainik Gomantak

पणजी : गोव्यातील ( Goa) धनगर- गवळी समाजाचा समावेश अनुसुचित जमातींत करावा यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या नेतत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेतली. गावडा, कुणबी, वेळीप समाजासह धनगर समाजाला हा दर्जा मिळावा यासाठी गाकुवेध बॅनरखाली मोठे आंदोलनही झाले होते. धनगर समाज (Dhangar) वगळता इतर तीन समाजांचा समावेश आदिवासींत करण्यात आला होता.

Goa : मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांची भेट
Goa SSC Result : मोरजी विद्याप्रसारक हायस्कुलचा 100 टक्के निकाल

धारवाड विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाकडून यासंदर्भात अहवाल तयार करून घेण्यात आला आहे. इतर राज्यात धनगर व गवळी हे दोन वेगवेगळे समाज आहेत. गोव्यातील धनगर समाज स्वतःला धनगर व गवळी एकाचवेळी मानतो. तत्कालीन आमदार स्व. विष्णू वाघ यांनी यासंदर्भात विवेचन करणारे भाषण विधानसभेत केले होते.

Goa : मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांची भेट
Goa: चाररस्ता-माशे रस्त्यावर मालवाहू ट्रक नदीत कोसळला

रजिस्टार ऑफ इंडिया या केंद्रीय गृह खात्यांतर्गत विभागाने धनगर समाजाला आदिवासींचा दर्जा देण्याचा प्रस्ताव वारंवार फेटाळला आहे. सरकारने याविषयी अभ्यास करून सुधारीत अहवाल पाठवण्यासाठी माजी सनदी अधिकारी नारायण दत्त अगरवाल यांना सल्लागार म्हणून नेमले. त्यानंतरही केलेली सुधारीत शिफारसही फेटाळण्यात आली आहे.

Goa : मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांची भेट
Goa : मांद्रे विकासाला मोठा हातभार : आमदार दयानंद सोपटे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com