Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: या निवडणुकीत मुख्यमंत्री बहुमताने विजयी होणार!

सुर्लातील कार्यकर्त्यांचा दावा; मतदारांचा प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद

दैनिक गोमन्तक

Pramod Sawant: विरोधकांनी कितीही अपप्रचार केला, तरी कार्यकर्त्यांची एकजूट आणि मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गेल्या वेळच्या पेक्षा मोठी आघाडी घेऊन विजयी होणार आहेत, असा ठाम विश्वास जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, सुर्लाचे पंच सुभाष फोंडेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. साखळी (Sanquelim) मतदारसंघातील 50 ही बुथांवर भाजपलाच आघाडी मिळणार असल्याचा दावाही या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी सुर्लाचे सरपंच चंद्रकांत घाडी, पंच भोला खोडगीणकर, शक्ती केंद्र प्रमुख मंथन वळवईकर, ओबीसी समिती अध्यक्ष शशिकांत नार्वेकर व कार्यकर्ते उपस्थित होते. (Pramod Sawant Latest News Updates)

अलीकडेच काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केलेले सुर्लातील ‘त्या’ कार्यकर्त्यांचा काहीच संबंध नाही. उलट ते पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत, असा दावा गोपाळ सुर्लकर आणि श्री. फोंडेकर यांनी केला. सुर्ल भागातून मुख्यमंत्र्यांना कमीतकमी एक हजार मतांची आघाडी मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री डॉ. सावंत (Pramod Sawant) यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी असून, या निवडणुकीत जनता मुख्यमंत्र्यांना भरघोस मतांनी निवडून देणार आहेत, असा विश्वास सुभाष फोंडेकर यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्याच्या विकासाठी कल्याणकारी योजना राबवल्या. कोरोनासारख्या कठीण काळात मुख्यमंत्री सावंत यांनी धिरोदात्त भूमिका बजावली आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: गोव्यात लवकरच सहकारी संस्थांसाठी ‘नवा कायदा’ , महाराष्ट्रातील MOFAच्या धर्तीवर सावंत सरकारचा मोठा निर्णय!

Goa Agriculture: काजू बागायतीत भाजीपाला, फळाफुलांचा मळा; पार्सेतील शेतकरी दाम्पत्याचा अभिनव प्रयोग

Goa Assembly Live: माझ्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री असल्याचा अभिमान

Digvesh Rathi: आयपीएलमधील वादानंतर दिग्वेश राठीची पुन्हा तीच चूक, DPL मध्ये फलंदाजासोबत बाचाबाची; VIDEO व्हायरल

Mapusa: म्हापसा बाजारातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे, गटारही उघडे; चतुर्थीआधी दुरूस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT